मोहोळ प्रतिनिधी तेज न्यूज
मोहोळ येथील तेलंगवाडी गावाजवळ कारने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दोन तरुण मित्रांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली.
सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळ तालुक्यातील तेलंगवाडी गावाजवळ 12 मे 2026 रोजी मध्यरात्री अंदाजे एक वाजता भीषण अपघात झाला.
पुणे-सोलापूर दिशेने येत असलेल्या MH 13 DT 8093 या इरटिका कारने समोर जाणाऱ्या TN 54 R 8881 या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली.अपघात इतका भीषण होता की, कारमधील दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या दोघांचे नाव संकल्प शिवपुत्र गुरव (वय २२) आणि त्यांचा मित्र नागनाथ मल्लाप्पा बिराजदार (वय २८) असे आहे.
दोन्ही तरुण दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील रहिवासी होते.अपघातानंतर दोघांना तात्काळ सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच दोघे मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.


