दिल्ली प्रतिनिधी तेज न्यूज
राज्यातील 10 वी आणि 12 वी परीक्षेचा (Exam) निकाल नुकताच जाहीर झाला असून 10 वी नंतर अनेकांनी नीट (NEET) परीक्षेची तयारी सुरू केली आहे. तर, 12 वीच्या (HSC) परीक्षेनंतर कित्ये विद्यार्थ्यांनी NEET परीक्षा देऊन भविष्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, केंद्र सरकारने नीट परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय घेतला असून यंदाच्या वर्षी म्हणजेच 3 मे 2026 रोजी घेण्यात आलेली नीट परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
आता ही परीक्षा नव्याने घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला असून काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही नीट परीक्षेतील पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित केला होता.देशातील सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांनी यंदा 3 मे 2026 रोजी नीटची परीक्षा दिली होती, त्यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. मात्र, देशभरात 42 तास अगोदरच या पेपरची प्रश्नपत्रिका बाहेर आल्याने पेपर फुटला होता. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेकडून हा परीक्षा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नीट परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ३ मे रोजी झालेला पेपर फुटल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पेपरफुटीच्या संपूर्ण प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आहेत.
एनटीएकडून ३ मे रोजी नीट २०२६ ची परीक्षा घेण्यात आली होती. मात्र या परीक्षेचा पेपर फुटल्याचे दावे केले जात होते. दरम्यान, या परीक्षेचा पेपर फुटल्याचे स्पष्ट होताच एनटीएने केंद्र सरकारच्या परवानगीने ३ मे रोजी झालेली परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली आहे. आता ही परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून, त्याच्या तारखा नंतर जाहीर केल्या जाणार आहेत. पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना नव्याने नोंदणी करावी लागणार नाही. तसेच ३ मे रोजी जिथे परीक्षा दिली तिथेच विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येईल, असे सांगण्यात आले आहे.

