म्हसवड प्रतिनिधी तेज न्यूज
फलटण तालुक्यातील जाधववाडी येथील विद्यार्थी कृष्णा विष्णू भांबुरे यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एसएससी परीक्षेत 100 टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केल्या बद्दल सातारा जिल्हा शिंपी समाजाचे अध्यक्ष इंजि.सुनिल पोरे यांनी अभिनंदन केले आहे.
पोरे म्हणाले कृष्णा विष्णू भांबुरे हा फलटण तालुक्यातील जाधववाडी गावचा रहिवासी असून त्याने सर्व विषयांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत १०० पैकी १०० टक्के गुण प्राप्त केले. त्यांच्या या यशामुळे परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.त्याने हे यश मिळवून शिंपी समाजाचे नाव उज्ज्वल केले आहे.त्याच्या या यशाचा शिंपी समाजास सार्थ अभिमान वाटत आहे.
तसेच या यशा मध्ये त्याचे आईवडील व शिक्षक यांचा वाटाही मोठा आहे. त्याच्या या यशाबद्दल समस्त सातारा जिल्ह्यातील शिंपी समाज बांधवांच्या कडून अभिनंदन करण्यात येत असून पुढील शिक्षणासाठी शिंपी समाज त्याच्या पाठीशी खंबीर उभा राहील असे शेवटी पोरे यांनी सांगितले


