भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
जानेवारी २०२६ मध्ये राज्यस्तरीय IAS परीक्षा झाली त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाळवणी मुली इयत्ता ४ थी मधील मुलींनी भरघोस यश मिळविले वर्गातील १४ मुली परीक्षेसाठी बसल्या होत्या. निकाल १०० % लागला असून गुणवत्ता यादीत तब्बल १३ विद्यार्थिनी आल्या.
कु.ओवी लिंगे २७४ गुण राज्यात १२वी, कु. रूंजी देठे, कु. शिवंण्या पिसे२७२ गुण दोघी जिल्ह्यात प्रथम, कु. अल्फिया मुजावर २६४ गुण जिल्ह्यात ५ वी, कु. राजकन्या कांबळे २६२ गुण जिल्ह्यात ६वी, कु. आरोही बोधे २५६ गुण जिल्ह्यात ९वी, कु. प्राजक्ता लिंगे २५४ गुण जिल्ह्यात १० वी, कु. वेदश्री म्हेत्रे २५२ गुण जिल्ह्यात ११ वी, कु. प्रणिती शिंदे २४४ गुण केंद्रात प्रथम, कु. अर्पिता शिंदे २४४ गुण केंद्रात प्रथम, कु. आनंदी कलढोणे २४४ गुण केंद्रात प्रथम कु. प्राजक्ता कारंडे २२४ गुण केंद्रात ४ था, कु स्वरा शिंदे १९८ गुण मिळाले.
सर्व यशस्वी मुलींचे व मार्गदर्शक शिक्षिका महानंदा साळुंखे यांचे, ग्रामस्थ, पालक, शा. व्य. स. अध्यक्ष किशोर खरडकर उपाध्यक्ष अमोल शिंदे सर्व सदस्य, विस्ताराधिकारी शारदा रासकर , मुख्याध्यापक सु. ना. शिंदे यांनी अभिनंदन केले.

