डोंबिवली प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर तेज न्यूज
सध्या बऱ्याच नागरिकांना शुगरचा त्रास असतोच, तो शुगरचा त्रास कमी होण्यासाठी लो गो शुगर फ्री पॅकेट्सचा वापर केला जातो.चहा,काॅफी,सेरेलॅक, फ्रुट,केक, मिठाई, पुडिंग्ज अशा अनेक पदार्थांमध्ये साखरेला उत्तम पर्याय म्हणून वापरले जाते.
यावेळी जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने डोंबिवली येथील एमआयडीसी निवासी भागातील सिद्धिविनायक मंदिरात तसेच सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील मधुमेह पीडीतांना लो गो शुगर फ्री पॅकेट्सचे विनामूल्य वाटप करण्यात आले.
याप्रसंगी जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, खजिनदार दत्ता कडुलकर, संस्थेचे जेष्ठ सल्लागार-अरविंद सुर्वे, हिंद सेना फाउंडेशनचे अध्यक्ष जयेश दाभोळकर, समाजसेवक बाळकृष्ण देसाई, मंगेश खोत हे उपस्थित होते.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जेष्ठ सल्लागार-अरविंद सुर्वे यांचे विशेष सहकार्य लाभले.या स्तुत्य उपक्रमाचे बऱ्याच नागरिकांनी कौतुक केले.

