पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
यशोदा प्रतिष्ठान, संचलित- सनराईज पब्लिक स्कूल अँड ज्यु. कॉलेज, शेळवे (ता. पंढरपूर ) यांच्यावतीने साहित्य व साहित्यिकांना आणि त्यांच्या लेखणीला प्रेरणा देण्यासाठी देण्यात येणारे कथा, कविता, कादंबरी, बालसाहित्य आणि ललित या साहित्यकृतींपैकी उत्कृष्ट ५ साहित्यकृतीला पुरस्कृत करण्यात येणारे साहित्य पुरस्कार जाहीर झाले आहेत.
कथासंग्रहासाठी-
१. काठावरच्या चेहऱ्यांच्या कथा - लेखक- सुरज चौगुले, सांगली
कवितासंग्रहासाठी -
२. जगणे गोंदून घेताना - कवयित्री- डॉ. अदिती काळमेख, सातारा
कादंबरीसाठी
३.खोल उन्हातली गर्द सावली - लेखक- डॉ.वसंत बिरादार, नांदेड
ललितसाठी..
४.शब्दांच्या रंगरेषा ( निबंध लेखन )- लेखक- युवराज चौगुले, कोल्हापूर
बालसाहित्यासाठी विभागून ...
५. बाप्पा माझे ऐका (बालसाहित्य) लेखक- बा. स. जठार, गारगोटी
६. अशीच असतात मुलं (बालसाहित्य) लेखक - शिवाजी बंडगर, सांगोला तर मराठी साहित्यात दीर्घ लेखन करणारे जेष्ठ साहित्यिक- हरिश्चंद्र पाटील ( टेंभुर्णी ) यांना जीवन गौरव पुरस्काराने तर विशेष सनराईज साहित्य गौरव पुरस्काराने डॉ. शिवाजी शिंदे यांना गौरविण्यात येणार आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार ११ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता सनराईज पब्लिक स्कूल & ज्यु. कॉलेज, शेळवे ( ता. पंढरपूर) येथे आमदार अभिजीत (आबा ) पाटील ( माढा मतदार संघ), मा.आमदार. दत्तात्रय सावंत ( पुणे विभाग शिक्षक मतदार संघ ), जिल्हा परिषद सदस्य संतोष - बागल, जिल्हा परिषद सदस्य - अमित साळुंखे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते सम्पन्न होणार आहे.
रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देऊन साहित्यिकांना गौरविण्यात येणार आहे.असे एका पत्रकाद्वारे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष - समाधान गाजरे, संस्थेचे संस्थापक सचिव, ग्रामीण साहित्यिक - अंकुश गाजरे, संस्थेचे उपाध्यक्ष -अजित लोकरे यांनी जाहीर केले आहे.

