पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथील स्टेशन मस्जिद येथे हिंदू मुस्लिम बांधवांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सर्व समाजातील व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे वफ्फ मंडळाचे समीर काझी हे उपस्थित होते.
यावेळी समीर काझी यांनी अशा प्रकारच्या सामाजिक ऐक्य जोपासून हिंदू मुस्लिम बंधुभाव वाढवणाऱ्या कार्यक्रमाचे कौतुक करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच माढ्याचे आमदार अभिजित पाटील , नगराध्यक्ष डॉ. प्रणितीताई भालके,उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, युवा नेते प्रणव परिचारक ,राजु सर्वगोड, सनी मुजावर, इकबाल बागवान ,आरपीआयचे जितेंद्र बनसोडे ,डॉ अरुण मेनकुदळे, डॉ.बजरंग धोत्रे , तमिम इनामदार इत्यादी मान्यवर उपस्थित होते या सर्वांनी या एकतेचे दर्शन घडवून आणणाऱ्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे नियोजन ॲड.यासीन शेख, आबीद बेळगावकर , आरिफ बेळगावकर , शुकुर बागवान, मोहम्मद लिगाडे , जावेद इनामदार वत्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते. यामध्ये पंढरपूर येथील सर्व मुस्लिम समाज व विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य इंजीनियरिंग, शिक्षक, वकील, पत्रकार ,व्यावसायिक, व्यापारी या सर्व क्षेत्रातील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सर्वांसाठी शीरखुर्मा चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रफिक शेख व राजूभाई मुलाणी यांनी केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष इब्राहिम बोहरी,निसार शेख, सलीम वडगावकर, जैनुद्दीन मुलाणी,बाळू शेख, युसुफ मुजावर,पापामिया इनामदार, सिराज मुलाणी अलामीन पेशइमाम , सोहेल बेद्रेकर ,आरपीआयचे सुनील सर्वगोड ,अरुण कोळी, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे, डॉ. बी पी. रोंगे , इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

