श्री.स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन मंदीर समितीच्या सत्कारा प्रित्यर्थ खा.ज्योतीताई वाघमारे यांचे मनोगत.
अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशैल गवंडी तेज न्यूज
श्री गुरु दत्तात्रयांचे चौथे अवतार असलेले अक्कलकोट वटवृक्ष निवासी श्री स्वामी समर्थांच्या भक्तीचा प्रचार आता संपूर्ण जगभर झाले आहे. यानिमीत्ताने श्री स्वामी समर्थाचे मुळ स्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात भाविकांची स्वामी दर्शनाकरीता वाढत आहे. यामध्ये महिला भक्तांची संख्या लक्षणीय आहे. सर्व महीला भाविकांना शांतपणे व सुलभतेने श्री स्वामी समर्थाच्या चरणी नतमस्तक होता यावे याकरीता मंदीर समितीकडून प्राधान्य देण्यात आले आहे.
मंदीर समितीचे सर्व नियोजन समितीचे चेअरमन महेश इंगळे हे अत्यंत कार्यकुशलतेने व समर्पण भावनेने हाताळत आहेत, त्यामुळे श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात महिला भाविकांसाठी असलेली स्वतंत्र दर्शन व्यवस्था पाहून समाधान वाटले असल्याचे मनोगत नूतन राज्यसभा सदस्या, खासदार ज्योतीताई वाघमारे यांनी व्यक्त केल्या. त्या नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थाचे दर्शन घेतले. या वेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन तथा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश इंगळे यांनी खासदार
ज्योतीताई वाघमारे यांचा श्री स्वामी समर्थांचे कॄपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. यावेळी खासदार ज्योतीताई वाघमारे बोलत होत्या.
या प्रसंगी मा.आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांचाही वाढदिवसानिमीत्त स्वामी समर्थाचे कृपावस्र, प्रसाद देवून चेअरमन महेश इंगळे यांनी सत्कार केला. यावेळी सोलापूर महापालिकेचे नगरसेवक अमोल बापू शिंदे, सो.म.पा.नगरसेवक प्रियदर्शन साठे, अमर पाटील, युवासेना उपजिल्हा प्रमुख दिपक पाटील, भिमा वाघमारे, गणेश तुपडोळे, लक्ष्मण वाघमारे, गणेश जंगडेकर, भैय्या माने, सागर नवत्रे, सिद्धार्थ गायकवाड, विश्वनाथ हडलगी, सुनिल कटारे, प्रा.सुर्यकांत कडबगांवकर, मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे, श्रीशैल गवंडी, विपूल जाधव, रमेश शिंदे, श्रीकांत मलवे, ज्ञानेश्वर भोसले आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.

