कांदिवली प्रतिनिधी भारत कवितके तेज न्यूज
कांदिवली येथे बाप्पा सिताराम सेवा मंडळातर्फे चौदावा सामुहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता.आमदार योगेश सागर हे या सोहळ्याचे आयोजक होते.सालाबादप्रमाणे या वर्षी ही सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून गरिब कुटुंबातील नव वरवधूचा सामुहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता.
शनिवार दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजता गोरसवाडी,मिलाप सिनेमा मागे, कांदिवली पश्चिम या ठिकाणी १५ नव वरवधूचा सामुहिक विवाह सोहळा पार पडला. सुरुवातीला बाप्पा सिताराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्प हार अर्पण करून दिप प्रज्वलन करण्यात आले.बाप्पा सिताराम यांच्या घोषणा देण्यात आल्या.
या वेळी आमदार योगेश सागर,या.खासदार गोपाळ शेट्टी, उत्तर मुंबई भाजपा अध्यक्ष व नगरसेवक बाळा तावडे, नगर सेवक गणेश खणकर मा.नगर सेवक कमलेश यादव नगर सेवक हिमांशू पारेख, नगरसेविका दक्षता कवठणकर, नगरसेविका लिना देहेरकर, विजय भाई गिरकर,मा.नगरसेविका प्रतिभा गिरकर,व इतर मान्यवर उपस्थित होते, या वेळी कांदिवली येथील भाजपच्या महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी स्वयंसेवी कार्य उत्तम पार पाडले, सामुहिक विवाह सोहळ्यात आलेल्या सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला.
या प्रसंगी नव वधूवरांना संसार उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.नव वधू वर यांच्या नातेवाईकांनी आमदार योगेश सागर यांचे आभार मानले.चौदावा सामुहिक विवाह सोहळा हा भारतीय जनता पक्षाचे आमदार योगेश सागर यांचे मार्गदर्शनाखाली, आयोजित करण्यात आला होता.

