पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
राज्यस्तरीय शिक्षण संजीवनी मासिकाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त शिवभूमी विद्यालय प्राथमिक विभाग या शाळेच्या आदर्श उपक्रमशील शिक्षिका कोठेकर योगिता संजय यांना शिक्षक संजीवनी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ कमलादेवी आवटे यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला श्रीम .कोठेकर योगिता या लेखिका कवयित्री असल्याने नियमित त्यांचे लेखन कार्य चालू असते वर्तमानपत्रे मासिके यात त्यांचे लेखन प्रकाशित होत असते . शिक्षक संजिवन मासिकातही त्याचे लेख कविता येत असतात त्यांना साहित्यीक क्षेत्रात अनेक पुरस्कारही प्राप्त आहेत . अशा शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव ८ मार्च रोजी पुणे येथील मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स टिळक रस्ता शुक्रवार पेठ येथे करण्यात आला .
शिक्षक संजिवनी तर्फे मासिकाचे संपादक डॉ संजय जगताप व कार्यकारी संपादक देविदास लिमजे यांनी महिला सक्षमीकरण व सकारात्मक विचार प्रसार हा कार्यक्रमा मागील उद्देश असल्याचे सांगितले.
याप्रसंगी स्मिता कुलकर्णी ,डॉक्टर राजश्री जायभाय प्रा.मिता चौधरी, कल्पना गौरी ,चंद्रलेखा बेलसरे यांची उपस्थिती होती कार्यक्रम मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला

