सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
ड्रीम ऑरगॅनिक फॉर्मर कप – 2026 राज्यातील पहिली सेंद्रिय शेती स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे आयोजक ड्रीम फाउंडेशन, बसव संगम शेतकरी गट वरजमाता व जिजाऊ महिला शेतकरी उत्पादक कंपनी आहेत.
जागतिक महिला शेतकरी वर्ष 2026 निमित्त राज्यातील पहिली सेंद्रिय शेती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत महिला शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे व त्यांच्या उत्पादनाला योग्य व्यासपीठ देणे हा उद्देश आहे.
स्पर्धेचे नाव ड्रीम ऑरगॅनिक फॉर्मर कप स्पर्धा कालावधी 26 मार्च ते 26 जुलै 2026 कोण सहभागी होऊ शकतात ? महिला शेतकरी सेंद्रिय पद्धतीने शेती करणाऱ्या किंवा करू इच्छिणाऱ्या महिला मोठ्या संख्येने सहभागी होऊन बक्षीस मिळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धेचे नियम फक्त 10 गुंठे क्षेत्रात सेंद्रिय शेती करायची आहे.90 दिवसांच्या आत त्या क्षेत्रातून जास्तीत जास्त भाजीपाला उत्पादन घेणे आवश्यक आहे.पूर्ण शेती सेंद्रिय पद्धतीने करावी लागेल.बक्षीस विजेत्या महिला शेतकऱ्यांना ₹21,000 पर्यंत बक्षीस तसेच राजमाता जिजाऊ प्रेरणादायी सेंद्रिय शेतकरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
सहभागासाठी संपर्क संगीता काशिनाथ भतगुणकी (समन्वयक) मो. 7219099955 काशिनाथ भतगुणकी मो. 9890948388 कार्यालय ओम गजानन चौक, जुने सोलापूर मो. 9837306337 साधावा.
विशेष सहकार्य कृषी विभाग सोलापूर बालाजी फाउंडेशन श्री सिद्धेश्वर रिसॉर्ट विशेष सूचना महिलांनी उत्पादन केलेला सेंद्रिय भाजीपाला हमी भावात विकत घेतला जाईल. आजच आपले नाव नोंदणी करा आणि सेंद्रिय शेतीत आपला ठसा उमटवा!

