पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आज शनिवार दिनांक १४ मार्च २०२५ रोजी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे व राज साहेब ठाकरे यांचे मामाश्री चंद्रकात त्रिंबकराव कमळाबाई वैद्य, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व रमाधाम वृद्धाश्रम खोपोलीचे अध्यक्ष यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले.
त्यावेळी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने वैद्य साहेबांचा सत्कार श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे सदस्य व शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुख पंढरपूर विभाग संभाजी शिंदे यांचे तर्फे “श्री” ची प्रतिमा, उपरणे, हार व दैनंदिनी देऊन करण्यात आला. त्यावेळी मंदिरे समिती कर्मचारी उपस्थीत होते.

