अकलूज प्रतिनिधी संजय निंबाळकर तेज न्यूज
अकलूज परिसर धनगर समाज उन्नती मंडळाच्या वतीने 2026/27 च्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंती समारंभ समीतीच्या अध्यक्ष पदी सर्वानुमते नागेश्वर ऊर्फ तात्यासाहेब पोटे यांची तर उपाध्यक्षपदी तात्यामंदीर नायकुडे व सचीव निलेश ठोंबरे व खजीनदार पदी परशुराम माने यांची निवड करण्यात आली.
त्या सर्व पदाधिकारीही यांचे अकलूज परिसर धनगर समाज उन्नती मंडळाच्या वतीने सत्कार अध्यक्ष तात्यासाहेब पोटे यांचा सत्कार आबासाहेब घुले पाटील यांनी तर उपाध्यक्ष तात्यामंदीर नायकुडे यांचा सत्कार संजय पाडोळे व सचीव निलेश ठोंबरे यांचा सत्कार सुधीर पिसे व खजीनदार परशुराम माने यांचा सत्कार पोपटराव गाडे यांनी केला हि मिटींग अंत्यंत खेळीमेळीत संपन्न झाली मिटींग चे सुत्रसंचलन व आभार मानले लक्ष्मीकांत वाघे यांनी.

