पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये गादेगाव येथील सुप्रिया राहुल बागल यांनी यश संपादन करून यांची उपअभियंता भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, महाराष्ट्र शासन या विभागामध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश (दादा) फाटे यांचे शुभहस्ते करण्यात आला.
या प्रसंगी मृदू व जलसंधारण विभागाचे अधिकारी राहुल बागल, श्री विठ्ठल अर्बन को ऑपरेटिव सोसायटीचे संचालक डॉ. रमेश फाटे, शुभम फाटे, विनय शिंदे, निवृत्ती भटकर, ज्ञानेश्वर पवार, संग्राम कापसे, सुमित बागल, स्वप्नाली घोडके, हर्षा सुतार उपस्थित होते.
जिद्द, चिकाटी व अभ्यासात सातत्य असेल तर यश नक्की संपादन करता येते तसेच महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय सेवेत अधिकारी म्हणून आपली निवड झाली आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे मत नागेश दादा फाटे यांनी सांगितले.

