पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
पुण्यातील वाघोली येथे रामकृष्ण सातव पाटील यांच्या वतीने आयोजित 68 व्या महाराष्ट्र केसरी 2026 स्पर्धेत किताब गटातील अंतिम फेरीत सोलापूरचा 'बाहुबली' महेंद्र गायकवाडने हिंगोलीचा 'चपळ चिता' सिकंदर शेखला चितपट केलं आहे. अंतिम फेरीत 'बाहुबली' महेंद्र गायकवाडने सिकंदर शेखला 3-0 ने पराभूत केलं आहे. महेंद्र गायकवाड आता या विजयानंतर गादी विभागातील विजेता ठरलेल्या हर्षवर्धन सदगीरसोबत फायनलध्ये कुस्ती करणार आहे.
सोलापूरचा 'बाहुबली' महेंद्र गायकवाडने हिंगोलीचा 'चपळ चिता' सिकंदर शेख या दोन्ही दोन्ही मल्लांनी पहिल्या मिनिटापासून आक्रामक सूरूवात केली होती. यावेळी 'बाहुबली' महेंद्र सिकंदर शेखने ताबा मिळवत दोन गुण मिळवले होते.
त्यानंतर स्टेपआऊट करून महेंद्र गायकवाडला एक गुण पटकावून 3 गुणांची आघाडी घेतली होती. त्यामुळे पहिल्या फेरीत महेंद्र गायकवाड 3 गुण सिकंदर शेख शुन्य गुणावप होता. दुसऱ्या फेरीत सिकंदर शेखने गुण मिळवण्याचा प्रयत्न केला.पण बाहुबली असलेल्या महेद्र गायकवाडने सिकंदरला दोन्ही फेऱ्यात एक गुण घेऊ दिला नाही. आणि शेवटी 'बाहुबली' महेंद्र गायकवाडने हिंगोलीच्या सिकंदर शेख 3-0 असा पराभव केला होता. या विजयासह महेद्र गायकवाड फायनलला पोहोचला आहे.
हा माती विभागाचा निकाल होता.दरम्यान गादी विभागात नाशिकचा माजी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सद्गीर आणि सोलापूर शहरचा जय पाटील यांच्यात अंतिम फेरी पाडली होती. या फेरीत दोन्ही मलांनी आक्रामक सुरूवात केली होती. पण हर्षवर्धन सद्गीरने आपल्या अनुभवाचा कस दाखवत अवघ्या 2 मिनिट 12 सेकंदात सोलापूरच्या जय पाटीलचा चितपट केलं होतं. खरं तर हर्षवर्धन सद्गीरने 10 गुणांची आघाडी घेतली होती, जर जय पाटीलचे शुन्य गुण होते.
यावेळी कुस्तीमध्ये दोन पैलवानाच्या गुणांमधला फरक हा 10 झाला तर तांत्रिक विजय (टेक्निकल सुपेरेयारीटी) मानली जाते. त्यामुळे हर्षवर्धन सद्गीरला विजयी घोषित करण्यात आले होते.त्यामुळे हर्षवर्धन सद्गीर माती विभागातून फायनलला पोहोचला आहे.

