बिंदू माधव जोशी यांच्या अथक प्रयत्नाने ग्राहक चळवळीचा कायद्यारूपी जन्म झाला
ग्राहक पंचायत , ग्राहकांची एक चळवळ!
लेखक - नंदकुमार देशपांडे
अखिल भारतीय ग्राहक पंचायत या ग्राहकांसाठी वाहून घेतलेल्या चळवळीला 52 वर्षे पूर्ण होत असून सहा सप्टेंबर रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा वर्धापन दिन असून या दिवशी ग्राहक चळवळीचे प्रणिते बिंदू माधव तथा नाना जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून ग्राहक कायद्याचा जन्म झाला. अशा या ग्राहक चळवळीचा वर्धापन दिन सोलापूर जिल्हा ग्राहक पंचायत व पंढरपूर तालुका ग्राहक पंचायतीच्या वतीने रविवारी संपन्न होत आहे.
संपूर्ण देशभरात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कार्य असून राज्य, जिल्हा, तालुका अशा विविध स्तरावर ही संघटना ग्राहकांसाठी आणि केवळ ग्राहकासाठीच काम करत आलेली आहे. संघटनेचे ध्येय धोरणे अमलात आणण्यासाठी ग्राहकांना समन्वय साधून काम करणे हे संघटनेचे वैशिष्ट्य आहे. गेल्या अनेक वर्षापासून पंढरपूर तालुक्यात अनेक मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते कार्यरत असून संपूर्ण जिल्हाभर अखिल भारतीय ग्राहक पंचायतचा ग्राहक आपत्ती कार्यकर्ता असल्यामुळे संघटनेचा आदरयुक्त दबदबा प्रशासनात आहे असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. पंढरपूर तालुक्याचा विचार केला तर पंढरपूर तालुक्यातील आत्तापर्यंत जे जे पदाधिकारी झाले त्यांनी ग्राहकाप्रती अनेक उपयोगी व सामाजिक प्रश्नाला हात घालून ग्राहकांच्या प्रश्नांची सोडवणूक केली आहे. यातील महत्त्वाचे म्हणजे राज्यातील प्रसिद्ध असलेल्या पंढरपूर बस स्थानकाच्या सिमेंट काँक्रीटचा प्रश्न ग्राहक पंचायतीने धसाला लावून व्यवस्था करून घेतली त्याची व्यवस्था करून घेतली आहे. त्याचबरोबर एसटीमध्ये ग्राहकांसाठी सोयीसुविधा याकरता पाठपुरावा करत असतानाच एसटीच्या प्रवासाकरता येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यात याव्यात याकरता बस स्थानकात ग्राहक राजा दिनाची सुरुवात करण्यात आली. त्या माध्यमातून एसटीने प्रवास करणाऱ्या ग्राहक प्रवाशांच्या समस्या चे निराकरण करण्यात आले आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यामधून महावितरण अर्थात एम एस ई बी च्या कार्यालयामधून महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी ग्राहक तक्रार निवारण आयोजन करण्यात आले. हे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे मोठे यश असून याकरता ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत हरदास पंढरपूर तालुका अध्यक्ष नंदकुमार देशपांडे व त्यांचे सहकारी यांनी यात मोलाचे सहकार्य केल्यानेच ग्राहकांच्या या माध्यमातून वाढीव बिले असो अथवा विजेचा प्रश्न असो अशा समस्या सोडवण्याकरता हा तक्रार निवारण दिनाच आयोजन करण्यास अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा मोलाचा वाटा आहे.
त्याबरोबरच सामाजिक तसेच काही वैयक्तिक तक्रारी निवारण अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीच्या माध्यमातून करण्यात आला. ग्राहकामध्ये मध्ये जागृती व्हावी याकरता अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने तालुक्यातील विविध मोठ्या गावामध्ये प्रबोधनात्मक शिबिरे, ग्राहक दिन आदी कार्यक्रमाद्वारे ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत ग्राहकांच्या अधिकार कसा आहे. याबाबत भारतीय ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी सोप्या भाषेत मार्गदर्शन करून ग्राहक चळवळीत अधिक लोकांनी या संघटनेत सहभागी व्हावे याकरता ग्राहक पंचायत पदाधिकारी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. रविवारी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा 52 वा वर्धापन दिन संपन्न होत आहे. यानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. ज्या कोणा कार्यकर्त्याला अखिल भारतीय ग्राहक पंचायतीमध्ये काम करण्याची इच्छा आहे अशांनीही या कार्यास सहभागी व्हावे असेही अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. ग्राहक संरक्षण कायदा हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचून ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती व्हावी हा संघटनेचा मूळ हेतू आहे. ग्राहकाला या कायद्यान्वये मालाची वैधता, मालाचा दर्जा, एखादी वस्तू खराब निघाली तर तो बदलून घेण्याचा अधिकार आहे .तसेच ज्या ठिकाणी ज्या प्रकारात पैसे देऊन व्यवहार केला जातो त्या सर्वाला ग्राहक संरक्षण कायदा लागू आहे .फक्त विना मोबदला ज्या ठिकाणी सेवा दिली जाते त्यास मात्र हा कायदा लागू नाही. ग्राहकांच्या हक्कासाठी ग्राहकांना न्याय मिळावा याकरता जिल्हा पातळी ते राज्य पातळीपर्यंत ग्राहक मंच. अर्थात ग्राहक न्यायालय ही स्वतंत्र व्यवस्था ग्राहकांसाठी ग्राहकाच्या हक्कासाठी कार्यरत आहे. ग्राहक संरक्षण कायद्यासाठी ज्या ज्या मान्यवरांनी योगदान दिले त्यांचे कार्यपुढे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या देश पातळीवर ते तालुका पातळीवर राबवणाऱ्या कार्यकर्त्याच्या बळावर आज अखिल भारतीय ग्राहक पंचायत रविवारी 6 सप्टेंबर रोजी बावन्नाव्या वर्षात पदार्पण करीत आहे.
या कार्यास तेज न्यूज च्या वतीने हार्दिक शुभेच्छा

