पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
दि.01/03/2025 रोजी सायंकाळी 04/00ते 04/30वा.चे दरम्याण समाजकल्याण शासकिय वस्तीगृह काणेज हॉस्पीटल शेजारी पंढरपूर येथुन मुलगी श्रेया व तिची मैत्रिण स्नेहा या त्यांची सायकल पंक्चर काढणे करिता ठाकरे चौक पंढरपूर येथे जात असताना पंढरपुर कराड रोडवरील काणेज हॉस्पीटलकडे जाणाऱ्या रोडवर अशोका लेंलड कंपनीचा टिपर गाडी नं MH13 EW 7677चा अज्ञात चालक याने ताब्यातील टिपर गाडी ही निष्काळजीपणे , भरधाव वेगाने चालवुन दोन्ही मुलींना जोराची धडक दिल्याने मुलगी श्रेया कांतीलाल गाडे वय-20 वर्षे ही गंभीर जखमी होवुन मयत झाली असुन तिची मैत्रिण नामे स्नेहा विठ्ठल सवईसर्जे वय-18 वर्षे रा-सलगर ता.मंगळवेढा जि. सोलापुर सध्या संभाजीराजे नगर पंढरपूर ही गंभीर जखमी झाली आहे.
याबाबत मुलीचे वडील कांतीलाल तुकाराम गाडे वय -42 वर्षे धंदा- मंजुरी रा. आवे ता पंढरपुर जि सोलापुर यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.
त्याप्रमाणे अशोका लेंलड कंपनीचा टिपर गाडी नं MH13 EW 7677चा अज्ञात चालक यांच्या विरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुरनं 105/2026 भा.न्या.सं 2023 चे कलम 106(1),125(अ),125(ब),281 मोटार वाहन का.क 184 ,134(अ)134(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गाडे यांनी फिर्याद दिल्याने सदर गुन्हा रजिष्टरी दाखल करून वर्दी रिपोर्ट माननिय हुजूर कोर्टात पाठवून पुढील तपास मा पोनि सो यांचे आदेशाने मपोसई खडके हे पुढील तपास करत आहे.

