पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुका शिक्षण सोसायटीच्या संचालकपदी नामदेव ज्ञानोबा देशमुख यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी बोलताना नागेश फाटे म्हणाले की शालेय व उच्च शिक्षणामध्ये गुणवत्तेची जोपासना केली जात असल्याने विद्यार्थी घडत आहेत. पुढील काळात विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबवण्यात यावे. शाळा,वस्तीगृहे आणि कॉलेज इमारतींचे व्यवस्थापन व सुधारणा चांगल्या पद्धतीने करण्यात यावी.भारतीय संस्कृती व सभ्यता यांचे जतन करणारे तसेच तंत्रप्रेमी व राष्ट्रप्रेमी विद्यार्थी घडावेत अशी अपेक्षा फाटे यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी उद्योजक नवनाथ बचुटे, डॉ रमेश फाटे, नवनाथ फाटे, शशिकांत शर्मा, निवृत्ती पाटील, कल्पक नामदेव देशमुख, उदय आदमिले आदी उपस्थित होते.

