पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सिंहगड महाविद्यालय, पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग व इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल (आयआयसी) सेल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी अविनाश लावणीस, बीएमआयटी, सोलापूर यांचे व्याख्यान व एकदिवसीय कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न झाली, अशी माहिती प्राचार्य डॉ. के. जे. करांडे यांनी दिली.
कार्यक्रमाचे आयोजन दोन सत्रांमध्ये करण्यात आले होते. सकाळच्या सत्रात “एक्सपर्ट सेशन ऑन स्टार्ट-अप, इथिकल अँड लीगल स्टेप्स” या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले, तर दुपारच्या सत्रात “प्रोटेक्टिंग आयपीआर अँड आयपी मॅनेजमेंट फॉर स्टार्ट-अप्स” या विषयावर सविस्तर कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यक्रमात आय.आय.सी. सेल, ई.डी.सी. सेल तसेच द्वितीय वर्षातील शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
एक्सपर्ट सेशन ऑन स्टार्ट-अप, इथिकल अँड लीगल स्टेप्स या सत्रामध्ये स्टार्ट-अप सुरू करताना आवश्यक असलेल्या मूलभूत टप्प्यांवर मार्गदर्शन करण्यात आले. कल्पनेपासून प्रत्यक्ष व्यवसाय उभारणीपर्यंतचा प्रवास स्पष्ट करण्यात आला. स्टार्ट-अप नोंदणी प्रक्रिया, कंपनीचे प्रकार (प्रोप्रायटरी, पार्टनरशिप, एलएलपी, प्रायव्हेट लिमिटेड), सरकारी मान्यता व योजना, निधी उभारणीचे मार्ग (सीड फंडीग, एंजल इनव्हेस्टमेंट, व्हेंनच्युअर कॅपीटल) याबाबत माहिती देण्यात आली. तसेच व्यवसाय करताना नैतिक मूल्यांचे पालन, ग्राहक डेटा संरक्षण, कर व कायदेशीर जबाबदाऱ्या, करार व कायदेशीर दस्तऐवजांचे महत्त्व यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. स्टार्ट-अप टिकवण्यासाठी पारदर्शकता, प्रामाणिकपणा व कायदेशीर अनुपालन किती आवश्यक आहे हे उदाहरणांसह स्पष्ट करण्यात आले.
प्रोटेक्टिंग आयपीआर अँड आयपी मॅनेजमेंट फॉर स्टार्ट-अप्स दुपारच्या सत्रात बौद्धिक संपदा हक्क (आयपीआर) यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट व डिझाइन रजिस्ट्रेशन यांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. नवकल्पना, तांत्रिक शोध किंवा ब्रँड आयडेंटिटी सुरक्षित ठेवण्यासाठी पेटंट व ट्रेडमार्क नोंदणी का आवश्यक आहे, तसेच आयपी व्यवस्थापन कसे करावे यावर मार्गदर्शन करण्यात आले. स्पर्धात्मक बाजारपेठेत स्टार्ट-अपचे संरक्षण, परवाना करार , तंत्रज्ञान हस्तांतरण आणि कायदेशीर वाद टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत उदाहरणांसह माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. दोन्ही सत्रांमध्ये लावणीस यांनी विद्यार्थ्यांना उद्योजकतेकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याचे आवाहन केले. शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


