भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील न्यू इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांनी रयत शिक्षण संस्थे मार्फत घेण्यात आलेल्या रयत प्रज्ञाशोध परीक्षा(RTS) इयत्ता ७ वी आणि रयत ऑलिंपियाड इयत्ता ९ वी स्पर्धा परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून या विद्यालयाचे खालील प्रमाणे ७ वी चे ५ विद्यार्थी मुलाखतीस पात्र आणि ९ वी चे ६ विद्यार्थी प्रकल्पास पत्र ठरले आहेत .
आर टी एस विद्यार्थी देठे काव्या समाधान-164,शेवतकर जान्हवी मोहन-150, पुसावळे श्रेया नवनाथ-138,शेरकर आर्या सचिन 136,नागणे अर्णव अतुल-132 तसेच देठे संध्या संपत - 130ही विद्यार्थीनी फक्त एक प्रश्नाने मेरिट लिस्ट मधून वंचित राहिली. विभाग प्रमुख -दिपक माने विषय तज्ञ योगेश जाधव , सुवर्णा लिंगे श्रीम. माधवी भोसले , अनिल मोहिते व युवराज नारनवर या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.
रयत ऑलिंपियाड पात्र विद्यार्थी - गौरी मासाळ -84.85, सायली यलमर -78.79, वैष्णवी माळी- 76.77, श्रेया हातगिने- 75.76, साक्षी शिंदे- 74.75, साक्षी ऐवळे- 73.74 या विद्यार्थ्यांनी हे संपादन केले.विभाग प्रमुख सारिका कदम , विषय तज्ञ उमादेवी नागटिळक , समाधान सपाटे , गणेश अवघडे , वैशाली पवार या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थी, विभाग प्रमुख ,मार्गदर्शक शिक्षक तसेच मुख्याध्यापक शिंदे कचरनाथ ज्ञानदेव,उपमुख्याध्यापिका मोरे प्रतिभा रमेशराव,पर्यवेक्षक बेसिकराव गौरीशंकर,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक सर्वांचे मध्य विभागाचे चेअरमन संजीव पाटील , सहसचिव माध्यमिक विभाग पवार बी एन , विभागीय अधिकारी जगदाळे , सहाय्यक विभागीय अधिकारी दाभाडे ,स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन संभाजी शिंदे , सदस्य वामन सराटे - पाटील, सरपंच रणजीत जाधव, उपसरपंच नितीन शिंदे, रामदास माने महाराज,ग्राहक पंचायतचे प्रशांत माळवदे, तसेच शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ, आणि पालक शिक्षक संघ यांनी अभिनंदन केले आहे.
रयत शिक्षण संस्थेमधील आरटीएस शिष्यवृत्तीधारक पहिल्या १५० विद्यार्थ्यांना ८ वी आणि ९ वी या दोन वर्षासाठी दरवर्षी २००० रुपये ची लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शिष्यवृत्ती व प्रशस्तीपत्र देण्यात येते तसेच रयत ओलिंपियाड शिष्यवृत्तीसाठी पहिल्या 50 विद्यार्थ्यांना कर्मवीर विद्या प्रबोधिनी अंतर्गत 3000 रुपयांची शिष्यवृत्ती व प्रशस्तीपत्र प्राप्त होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भर्तरी विधाते यांनी केले आणि शेवटी आभार प्रदर्शन पालक राहुल हातगिने यांनी केले. यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


