डोंबिवली प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर तेज न्यूज
सामाजिक कार्यात अग्रेसर, मदत-सहकार्य करण्याचे दायित्व, स्वयंरोजगार निर्मितीसाठी मार्गदर्शन, सामाजिक क्षेत्रात काम करणारी डोंबिवली येथील आबाजी सणस ट्रस्ट ही अग्रगण्य संस्था.मदत करण्याच्या उद्देशाने ओमकार साई बाल संगोपन केंद्रास आर्थिक मदत सुपूर्द करण्यासाठी नुकताच आबाजी सणस ट्रस्टचे अध्यक्ष ॲड.प्रकाश सणस यांनी बकुळ बंगला, अवधुत सोसायटी, डोंबिवली(पश्चिम) येथे कार्यक्रम घेण्यात आला होता.
त्याअगोदर कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे तात्यासाहेब माने, प्रवीण कराळे, रोहिदास सणस, गुरुनाथ तिरपणकर, ट्रस्टचे अध्यक्ष ॲड.प्रकाश सणस,बाल संगोपन केंद्राच्या अध्यक्षा सौ.सुविधा दांडेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व स्वामी समर्थांच्या प्रतिमेला व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली.तसेच सुरुवातीला च बालसंगोपन केंद्रातील मुलांनी ईशस्तवन, स्वागत गीत सादर करुन कार्यक्रमात रंगत आणली.
याप्रसंगी आबाजी सणस ट्रस्टच्या वतीने ओमकार बाल संगोपन केंद्रास उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख तात्यासाहेब माने यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत बाल संगोपन केंद्राच्या अध्यक्षा सौ.सुविधा दांडेकर यांजकडे दहा हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.तात्यासाहेब माने आपल्या भाषणात आबाजी सणस ट्रस्टच्या कार्याचा गौरव केला.ॲड.प्रकाश सणस यांनी आपले आयुष्य खडतर परिस्थितीत जगले आहेत.त्यानुसार समाजातील अडचणी सोडविण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात.हाच त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे,असे आवर्जून सांगितले.
संकल्प सिद्धी सातारा संघाचे अध्यक्ष प्रवीण कराळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बाल संगोपन केंद्राच्या कार्याचे कौतुक केले.एक चांगला उपक्रम घेण्यासाठी ॲड.प्रकाश सणस यांनी चांगली संस्था निवडली.व ट्रस्ट ला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून माझ्या कंपनीतील ट्रस्ट कडून दहा हजार रुपये मिळवून देण्याचे प्रवीण कराळे यांनी आश्वासन दिले.ट्रस्टचे सल्लागार व ॲड.प्रकाश सणस याचे फॅमिली मेंबर इंजिनिअर रोहिदास सणस यांनी आपल्या भाषणात बंधुबाबत प्रकाश सणस हे चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत.स्वत: रात्र काॅलेज करुन पत्नी व मुलांना उच्च शिक्षण देऊन एक सुशिक्षित फॅमिली निर्माण केली.रोहिदास सणस यांनीही ट्रस्ट ला आर्थिक मदत सुपूर्द केली.जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी आपली व प्रकाश सणस यांची३५वर्षापासून जुनी मैत्री आहे, आणि प्रकाश सणस यांना सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा फार मोठा अनुभव आहे हे आवर्जून सांगितले.तसेच मातृत्वाच्या दृष्टिकोनातून बाल संगोपन केंद्रातील१४मुलांचे संगोपन केंद्राच्या अध्यक्षा सौ.सुविधा दांडेकर या आईच्या मायेने करत आहेत ही कौतुकास्पद बाब आहे.आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने वाचनिय पुस्तके संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी केंद्राच्या अध्यक्षा सौ.सुविधा दांडेकर यांजकडे सुपूर्त केली.ट्रस्टच्या वतीने मुलांना पेन व वही भेट देण्यात आली.तसेच आबाजी सणस ट्रस्टच्या कार्यकर्त्यांना देखील बाळाबापु सणस शैक्षणिक मदत देण्यात आली.
चैतन्य रामदास सणस पाच हजार रुपये, तन्वी संदीप मांढरे, दोन हजार पाचशे रुपये, मनीषा दत्तात्रय कदम दोन हजार पाचशे रुपये अशी मदत देण्यात आली.ट्रस्टचे अध्यक्ष ॲड.प्रकाश सणस यांनी आपल्या प्रास्ताविकात आबाजी सणस ट्रस्टच्या गेल्या तीन वर्षातील सामाजिक कार्याचा आढावा घेतला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच बाल संगोपन केंद्राच्या अध्यक्षा सौ.सुविधा दांडेकर व त्यांचे कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

