पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
कॅप्टन शामराव लोकरे अभ्यासिकेच्या माध्यमातून देण्यात येणारा स्वामी विवेकानंद पुरस्कार 2026 हा मुंबई येथील उद्योगपती आणि वृक्षमंत्र अजित कंडरे यांना जगद्गुरु श्री.संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज ह.भ.प शिवाजी मोरे महाराजांच्या हस्ते देण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील उद्योजक सुरेश पाटील उपस्थित होते.
देव मंदिरात नसून चराचरात आहे, आणि तो निसर्गात आपल्याला प्रत्यक्ष दिसू शकतो.त्यामुळे वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन यामध्येच देवाचा वास असतो, त्याचप्रमाणे आपले शुद्ध कर्तव्य असेल तर परमेश्वराची कृपा प्राप्त होते असे मत ह भ प शिवाजी मोरे महाराजांनी व्यक्त केले.
स्वामी विवेकानंद यांच्या नावाने पुरस्कार मिळाल्यामुळे आणखीच माझ्यावरील जबाबदारी वाढली असून भंडीशेगावच्या सार्वजनिक कामांमध्ये मी सातत्यने ग्रामस्थांच्या सहकार्याने सोबत राहणार असल्याचे मत पुरस्कार प्राप्त अजित कंडरे यांनी व्यक्त केले.
गावांचा विकास झाला पाहिजे विद्यार्थ्यांचा खेळामध्ये असणारा प्रतिसाद आणि यश हे खूप चांगल्या प्रकारचे असून भंडीशेगाव ग्रामस्थांच्या कार्यास शुभेच्छा देत असून त्यांच्या सोबत कामात राहणार असल्याचे देखील कार्यक्रमाचे अध्यक्ष पुणे येथील उद्योजक सुरेश पाटील यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा हिवताप कार्यालयाचा पदभार मिळाल्याबद्दल डॉ.एकनाथ बोधले यांचा सत्कार करण्यात आला, त्याचप्रमाणे नूतन जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी संतोष बागल व पंचायत समिती सदस्य नाना गोसावी यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला. सूत्रसंचालन राजश्री कंडरे यांनी केले.
यावेळी कार्यक्रमास पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक गंगाराम विभुते,भंडीशेगावच्या सरपंच सुमन येलमार,संजय रणखांबे,मनीषा येलमार, अलिश कंडरे, संजय अभ्यंकर,संजय येलपले,बाळासाहेब लोकरे,माजी उपसरपंच विजय पाटील,मंगेश ननवरे,अनिल जाधव, डॉ.अनिल कंडरे, निवृत्त मेजर ज्ञानेश्वर पाटील आदी उपस्थित होते

