पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
दि. 2 मार्च 2026 सोमवार रोजी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत दि. 2 ते 8 मार्च अखेर महिला सप्ताह साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्त आज दि .2 मार्च रोजी जि . प .प्राथ. शाळा, विकासवाडी या शाळेची प्रभातफेरी काढण्यात आली.
प्रभात फेरीनंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन भाळवणी केंद्राच्या केंद्रप्रमुख तसेच कार्यक्रम अध्यक्ष रासकर मॅडम,SMC उपाध्यक्ष व महिला वर्गांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन संपन्न करण्यात आले .
त्यानंतर शाळेचे सहशिक्षक महेश जमदाडे यांनी या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये महिला सप्ताह विषयी माहिती सांगून महिलांचं सक्षमीकरण मार्गदर्शनासाठी मुख्या गवळी सर मार्गदर्शन लाभले . त्यानंतर आशा सुवर्णा देठे व सुनिता देठे यांनी मातांच्या आहाराविषयी तसेच गर्भावस्थेत असताना व गर्भावस्थेनंतर कोणकोणत्या लसी ,आहार घेण्यात यावा कॅन्सर विषयी जनजागृती करण्यात आली तसेच शासनाच्या आरोग्यविषयी असणाऱ्या विविध योजनांचे सखोल मार्गदर्शन केले .
सदर कार्यक्रमासाठी आरोग्यसेविका टोंगळे मॅडम व परचंडराव यांनी महिलांच्या हिमोग्लोबीनची मोफत तपासणी केली . यावेळी विद्यार्थी पालक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


