पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे राज्यातील 27920 ग्रामपंचायतीमध्ये सफाई कामगार, पाणीपुरवठा कामगार, विजपुरवठा कामगार, करवसुली कर्मचारी लिपीक इत्यादी पदावर काम करीत असलेल्या सुमारे 60 हजार कामगार अत्यल्प वेतनात काम करीत आहेत. अशा विविध मागणीचे निवेदन माढा पंढरपूर विधानसभेचे आमदार अभिजीत पाटील यांना संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालीका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी मंजूर करावी.ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना उपदान लागू करणे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची भविष्यनिर्वाह निधिची रक्कम कामगार भविष्य निर्वाह निधी संघटन (इ.पि.एफ.) यां कार्यालयात जमा करणे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नविन सुधारीत किमान वेतन लागू करणे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी लादलेली उत्पन्नाची अट रद्द करून शंभर टक्के वेतन देणे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधात सुधारणा करणे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची गेले अनेक वर्षापासून सर्व जिल्हा परिषद मध्ये 10 टक्के भरती बंद असून ही भरती तात्काळ सुरू करावी, असे निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे विविध पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


