पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आपणास आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर करायचे आहे आणि यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी लागणार आहे, हा निधी केवळ भाजप सरकार जनतेला देऊ शकते, भविष्यात पंढरीत आंतरराष्टीय विमानतळ होऊ शकते असा शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी भाजप आणि शहर विकास आघाडीच्या उमेदवारांना नगरपालिकेत निवडून द्या असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ श्यामल शिरसट, गुरुदास अभ्यंकर, गणेश अधटराव, बालाजी मलपे, शैलेश बडवे, अपर्णा तारके, रचिता सगर, प्रदीप पवार, श्वेता डोंबे, शंकर सूरवसे, अमोल डोके, भागवत बडवे, बाळासाहेब कौलवार, माऊली हळवणकर, अक्षय वाडकर, महादेव धोत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
रविवार रोजी भाजप व शहर विकास आघाडीच्या वतीने शिवतीर्थ येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी श्री.गोरे बोलत होते, ते पुढे म्हणाले पाचशे कोटींचे रस्ते करायचे आहेत, तीर्थक्षेत्र विकास योजना करण्यासाठी ३५०० कोटी लागणार आहेत, विरोधक हा निधी कसा आणतील, हे पैसे कोणाकडे मागणार? आलेला निधी कसा वापरणार? नुसती वैयक्तिक टीका करून विकास करता येत नाही त्यासाठी दृष्टी लागते. वाराणसी, अयोध्या येथे फाईव्ह स्टार हॉटेल्स झाली आहेत याप्रमाणेच पंढरपूर विकसित करायचे आहे. यमाई तलाव सुशोभीकरण, नामसंकीर्तन नाट्यगृह, उद्याने विकसित करण्यात येत आहेत.
माजी आमदार प्रशांत परिचारक म्हणाले, पंढरपुरात गेल्या चाळीस वर्षांत ४० लाख टन ऊस उत्पादन घेतले आहे, आज तालुक्यातील द्राक्ष, ऊस, डाळिंब लागवड वाढली असून तालुका सुजलाम सुफलाम झाला आहे. मोठे मालक श्रीमंत सुधाकर परिचारक १९६५ पासून राजकारणात आहेत, खेड्या सारखी परिस्थिती होती, एकही डांबरी रस्ता नव्हता केवळ घरपट्टी, पाणीपट्टी, आणि दुकानाचे भाडे एवढेच उत्पन्न शहरातून मिळते, आणि नगरपालिकेचा खर्च कोट्यवधी रुपयांचा आहे.
१९९५ साली प्रथम ड्रेनेज सिस्टीम तयार केली, पुढे तीन टप्प्यात काम करून आज संपूर्ण शहरात भू अंतर्गत गटार योजना सुरू आहे, गेल्या चाळीस वर्षांत वीज, रस्ते, ड्रेनेज, पाण्याचे नियोजन, जलशुद्धीकरण प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, शहर व त्यांनी उपनगरात सिमेंट रस्ते, बागा, स्विमिंग टँक, नाट्यगृह, यमाई तलाव सुशोभीकरण शहराला जोडले जाणारे सात राज्य महामार्ग आदी विविध विकासकामांचा आढावा परिचारक यांनी घेतला.
इसबावी, सरगम चौक येथे होणारे उड्डाणपूल, जड वाहतूक शहराबाहेरून नेणारा रिंग रोड अशा विविध विकासकामांची माहिती चाळीस वर्षांत कोणकोणती विकासकामे केली याची माहिती देऊन मागच्या जाहीरनाम्यात पूर्ण करण्यात आलेल्या कामांची माहिती देण्यात आली.
यावेळी चंदु जगताप, भारत माळी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे श्रीकांत शिंदे, जितेंद्र बनसोडे, कृष्णा वाघमारे, आप्पा राऊत, माजी नगरसेवक बागवान, पंडित भोसले, सतीश धनवे, सुनील वाळूजकर, पंढरपूर अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश मुळे, भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, स्वेरी कॉलेज चे डॉ.बी.पी.रोंगे सर, लक्ष्मण शिरसट यांनी मनोगत व्यक्त केले.
नगरपालिका निवडणुकीत प्रचारात विरोधक परिचारक कुटुंबियांवर अनेक खोटे आरोप करत आहेत, यावेळी श्रीकृष्ण यजुर्वेद जागेविषयी दस्तुरखुद्द मालक भारत माळी यांनी स्पष्ट केले, सुरवसे बिल्डिंग वरून राजकारण सुरू आहे पण या जागेचे केवळ डेव्हलपर परिचारक आहेत असा जाहीर खुलासा करून विरोधकांचे खोटे आरोप हाणुन पाडले. तसेच दमदाटी आणि दादागिरीची भाषा करणाऱ्या लोकांना सज्जड भाषेत समज माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली.
आज विरोधकांना बडवे उत्पात सेवाधारी मंडळींचा कळवळा आला आहे पण २०१४ साली त्यांच्या ताब्यातून देऊळ काढून घेतले त्यावेळी याच लोकांनी फटाके उडवून आनंद साजरा केला होता. तेव्हा कुठे गेले गेली होती तुमची माया? असा जाब माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी विचारला.

.jpeg)
