पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने वाडीकुरोलीत हजारों महिलांचा स्नेहमेळावा संपन्न झाला.
यावेळी मकर संक्रांतीनिमित्त वाडीकुरोली येथे हुरडा पार्टी, स्नेहमेळावा व ‘सन्मान नारी शक्तीचा’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सहकार शिरोमणी वसंतदादांचा सामाजिक वारसा अखंडपणे पुढे चालू ठेवत असताना नेहमी परिवारातील पुरुष मंडळींचे अनेक कार्यक्रम होत असतात. यावेळी मकर संक्रांतीच्या मंगल पर्वावर घर ,संसार ,कुटुंब आणि जबाबदाऱ्यात गुंतलेल्या माता-भगिनी यांना थोडा वेळ स्वतःसाठी मनमोकळ्या आनंदासाठी आणि एकमेकांशी जोडण्यासाठी मिळावा या हळव्या, आपुलकीच्या भावनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चार तास आपल्या कौटुंबिक ताणतणाव विसरून या कार्यक्रमात महिलांनी मनमुराद आनंद घेतला.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका सौ.संगीताताई काळे सौ. जयश्रीताई काळे मोनिकाताई काळे संचालिका सौ.संगिता देठे संचालिका सौ.उषाताई माने यांनी उपस्थित महिलांचे मनोभावे स्वागत केले.या कार्यक्रमास कुटुंबप्रमुख आईसाहेब मालनबाई काळे व सुमन काळे आवर्जून उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाला हजारो महिला माता-भगिनींची अभूतपूर्व उपस्थिती लाभली. महिलांच्या सन्मानाचा, संस्कृतीचा आणि सक्षमीकरणाचा जागर करणारा आनंददायी कार्यक्रम राहुल नवनाथ राजे यांनी यावेळी सादर केला. या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


