पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
मी एक उच्चशिक्षित महिला उमेदवार आहे. आपल्या मतदान गटातील मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.मी आपल्या मतदान गणात लढवण्याचा माझा मानस आहे .तसेच गोरगरीब विद्यार्थी व जनतेची सेवा करण्याचा विचार आहे.आम्हास कोणताही प्रकारचा राजकीय वारसा नाही व सर्वसामान्य व्यक्तिमत्व म्हणून मी हा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे.आता हि निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती म्हणून माझ्यासमोर आहे.
माझे पती राहुल नामदेव देशमुख हे गेल्या 10 ते 12 वर्षे झालं लोकांच्या सेवेत आहेत.ऑनलाईन चे कसलेही काम असू देत आतापर्यंत कोणतेही फी न घेता लोकांचे फॉर्म भरून दिले आहेत. संगणक शिक्षण देऊन शेळवे,पटवर्धन कुरोली,देवडे, वाडीकुरोली, पिराची कुरोली या गावचे विद्यार्थी घडवले आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या यशापर्यंत पोहचवण्यात आम्ही प्रयत्न केले आहेत.तेच विद्यार्थी आज आमचा प्रचार करत आहेत.त्यांना आम्ही शिक्षण हि देत आलो आहोत अजून हि देत आहोत.
ग्रामीण भागातील युवा पिढी सक्षम झाली पाहिजे व त्यांना लवकर रोजगार मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न केले आहेत व यापुढे देखील प्रयत्न करणार आहोत.तसेच काही मुलांना इंजिनीयर,वकील,डॉक्टर करण्यात आम्ही कष्ट घेतले आहे. इथून पुढच्याही काळात आम्ही विद्यार्थी घडवून त्यांना सक्षम कसं करता येईल यासाठी प्रयत्न करू.
जर आपण मला संधी दिली तर त्याचं सोनं करून दाखवू यासाठी सुज्ञ मतदार राजांनी आम्हाला आशीर्वाद रुपी मतदान करावे. असे आवाहन प्रचिती राहुल देशमुख यांनी केले आहे.
आज अर्ज दाखल करण्यासाठी शेळवे गावचे ग्रामपंचायत सदस्य अर्जुन आसबे,डॉ.शशिकांत नागटिळक,सुभाष ताठे,संतोष गाजरे, नवनाथ आसबे,धनाजी गाजरे,विशाल कौलगे,राहुल देशमुख,विजय ताठे,समाधान लोकरे,आदी शेळवे ग्रामस्थ उपस्थित होते.

