सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर महापालिका निवडणुकीचा प्रचार सुरू होण्याआधीच शहर हादरवणारी घटना घडली आहे. भाजपमधील दोन गटात झालेल्या अंतर्गत वादातून एकाची हत्या झालीय.
रक्तरंजित घटनेमुळे संपूर्ण सोलापूरचं राजकीय वातावरण तापलंय. शहरातील प्रभाग क्रमांक दोनमध्ये झालेल्या हाणामारीचा शेवट थेट खुनात झाल्याने, निवडणूक रणधुमाळीला हिंसक किनार मिळाली आहे.निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरुन झालेल्या सोलापुरातील राड्यानंतर राज्यभरातील निवडणूक प्रक्रियेला गालबोट लागलं आहे. उपचारदरम्यान मृत्यू झालेल्या सोलापुरातील मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.
बाळासाहेब सरवदे हे मनसेचे पदाधिकारी होते, शिवाय युवक नेतृत्व होते. त्यामुळे, त्यांच्या अंत्ययात्रेला मोठी गर्दी होती, आज त्यांची अंत्ययात्रा मोठ्या पोलीस सुरक्षेत निघाली होती.राजकीय वादातून मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची काल हत्या झाली होती, आज अत्यंत शोकाकुल वातावरणात बाळासाहेब सरवदेंच्या सोलापुरातील जोशी गल्ली परिसरातून अंत्ययात्रेला सुरुवात झाली होती. हजारोच्या संख्येने नागरिक अंत्ययात्रेत सहभागी झाले, विविध पक्षाचे राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते नातेवाईक आणि मित्र परिवार अंत्ययात्रेत होता. तसेच, राजकीय अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्तही तैनात होता.पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्त संपूर्ण अंत्ययात्रेत तैनात करण्यात आला होता, तसेच अंत्ययात्रेसोबत पोलिसांची गाडी आणि पोलीसांची फौजही सहभागी झाल्याचं दिसून आलं.
दरम्यान, येथील महापालिका निवडणुकीदरम्यान अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी प्रभाग 2 मधील भाजपच्या दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेल्या वादातून प्रकरण चिघळलं आणि या वादाचा शेवट एका तरुणाच्या निर्घृण हत्येत झाला.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब पांडुरंग सरवदे (वय ३६, रा. जोशी गल्ली, रविवार पेठ, सोलापूर) यांचा निघृण खून करण्यात आला.
या दुःखद प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री अमित ठाकरे उद्या दिनांक ४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता सरवदे कुटुंबीयांची त्यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट घेणार आहेत.

.jpg)