पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गादेगाव येथे बाल विद्यार्थ्यांचा आनंदी बाजार डे मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान व्हावे त्याचबरोबर शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना आपल्या शेतामध्ये पिकणारा माल बाजार मध्ये चांगल्या बाजार मुल्यामध्ये विकता यावा यासाठी शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गादेगाव येथे दरवर्षी बाजार डे चे आयोजन करण्यात येते .
या बाजार मध्ये विद्यार्थी आपल्या शेतामधील फळे ,भाजीपाला ,कडधान्य त्याचबरोबर विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवून विकण्यासाठी घेऊन येतात . यावेळी विद्यार्थी आपल्या वस्तूची योग्य किंमत करून वस्तू प्रत्यक्ष विकण्याचा अनुभव घेतात यामुळे विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान त्याचबरोबर बाजारामध्ये वस्तू विकण्यासाठी लागणारे कौशल्य माहीत होते. यामुळे शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शेतीशी निगडित वेगवेगळे व्यवसाय व उत्पादने घेण्यासाठी प्रोत्साहन मिळते या बाजार डे मध्ये जवळपास 95 हजार ओलाढाल झाली असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे यांनी दिली.
या बाजार डेचे उद्घाटन उद्योगपती पद्माकर बागल ,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बागल ,ज्येष्ठ नेते गोरख बागल ,मनसेचे अनिल बागल ,गणेश फाटे ,समाधान बागल, अजित नागणे, विजय खवणनकर,यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. यावेळी सावित्रीबाई फुले यांची जयंती असल्याकारणाने लहान मुली सावित्रीबाई फुले यांचा वेश परिधान करून उपस्थित होत्या. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन माता-पालक यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी विद्यार्थिनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशस्वी प्रकल्प संचालिका वर्षा मोरे ,तनुजा यादव ,उपप्राचार्य नियाज मुलाणी, सहशिक्षक शितल मस्के, लिना बागल, शीतल बागल, फर्जना पटेल, सुनिता राठोड, भिमा रकटे,अजय सावंत, वैभव माने, माहाकू खांडेकर, अविता कांबळे, तेजश्री गव्हाणे ,मोनाली गायकवाड, सोनाली मागाडे, अजय मोरे ,दिपक देशमुख,प्रवीण यादव, नवनाथ शिंदे, सायली सोनवले, दादासाहेब मोरे, आदींनी परिश्रम घेतले.

