भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील भवानी मंदिराच्या शेजारील 15 एकर उसाचे शॉर्टसर्किटमुळे जळून सात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली या घटनेची माहिती ग्रामसुरक्षा संदेशानुसार ग्रामस्थांना देण्यात आली. परंतु आगीचे प्रमाण मोठे प्रमाणात असल्यामुळे आग विझवण्यास यश आले नाही.
यामध्ये रामचंद्र वसंत सावंत गट ९५३/२ नंबर २ एकर ऊस,१ एकर आंबा,मोहन तुकाराम माने गट ९५३/१ ,४ एकर ऊस, दीपक विलास तारळकर गट ९८५ दीड एकर ऊस, दिलीप कुमार महादेव वाघमारे ९८९/६ अडीच एकर ऊस, मनोज रामचंद्र डंबाळ गट नंबर ९८६ दीड एकर ऊस ,अनिल ज्ञानदेव वाघमारे ९८९/४ दीड एकर ऊस अशी नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.
हि घटना जुना शिंदे डी पी येथील डी पी वर शॉर्टसर्किट झाल्यामुळे घडल्याचे प्राथमिक दर्शनी दिसून येत आहे.या भागात वारंवार शॉर्टसर्किट होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामध्ये ठिबक, पाईप, सबमेन, केबल, चेंबर, आधी सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
याबाबत शेतकरी रामचंद्र सावंत यांनी सांगितले की या भागात प्रत्येक वर्षी ऊस जळण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास काढून घेतला जात आहे. पिकासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करून हे असे नुकसान वारंवार शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे.याबाबत आम्ही वीज वितरण कंपनीशी संपर्क साधून त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे प्रयत्न करावे असे निवेदन देण्यात आले आहे. या घटनेचा पंचनामा करून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान मिळावे.अशी मागणी तहसीलदार पंढरपूर यांच्या कडे करणार आहे.

