पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गादेगाव येथे बारावी च्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक पंढरी भूषण चे संपादक शिवाजीराव शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सांगोला गणेश पाटील, मनसेचे अनिल बागल, नितीन कदम ,महेश लटके हे उपस्थित होते.
विद्यार्थी दसेपासूनच विद्यार्थ्यांनी आव्हानंतर वाचन अवांतर लेखन ठेवणे आवश्यक असल्याचे शिवाजीराव शिंदे यांनी सांगितले . दहावी बारावीनंतर विविध स्पर्धा परीक्षा वेगवेगळ्या एमपीएससी यूपीएससीच्या परीक्षा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात द्याव्यात आपल्या आई-वडिलांचे नाव मोठं करावं, दहावी बारावीच्या गुणावर पुढील वर्षाचे प्रवेश अवलंबून असतो यामुळे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त अभ्यासावरती लक्ष केंद्रित करून भयमुक्त वातावरणामध्ये परीक्षा द्यावी असे आवाहन पीएसआय गणेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले.
आपलं ध्येय निश्चित करून त्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी नेहमी प्रयत्नशील राहून आपली प्रगती करावी असे मत संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतून अकरावी बारावी मध्ये आलेले विविध अनुभव व्यक्त केले . यामध्ये सृष्टी बागल ,प्रांजल ढेकळे, सोहम देठे ,भक्ती झांबरे, प्रणिती भोसले ,ऋतुजा नागणे, कस्तुरी कुलकर्णी, प्रेरणा यलमार ,अथर्व मोरे आदी विद्यार्थिनी आपली मनोगत व्यक्त केली.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी. प्रकल्प संचालिका वर्षा मोरे , प्राचार्य तनुजा यादव ,उपप्राचार्य नियाज मुलाणी, सहशिक्षक शितल मस्के, लिना बागल, शीतल बागल, फर्जना पटेल, सुनिता राठोड, सिमा रकटे,अजय सावंत, वैभव माने, माहाकू खांडेकर, अविता कांबळे, तेजश्री गव्हाणे ,मोनाली गायकवाड, सोनाली मागाडे, अजय मोरे ,दिपक देशमुख,प्रवीण यादव, नवनाथ शिंदे, सायली सोनवले, दादासाहेब मोरे,यांनी घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानी पवार यांनी केले तर आभार प्रणाली नागणे यांनी मानले.

