हातकणंगले प्रतिनिधी तेज न्यूज
रविवार दिनांक १ मार्च २०२६ रोजी कवि सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित रयत शिक्षण संस्था छत्रपती शिवाजी कॉलेज बॅरिस्टर पी जी पाटील सभागृह सातारा येथे राज्यस्तरीय २७ वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर साहित्य संमेलनात कवयित्री श्रीम. तृप्ती राघवेंद्र सबनीस, जवाहर नगर, एस. व्ही. रोड, गोरेगाव(प), मुंबई यांच्या प्रवास शब्दांचा या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन डॉ शिवाजी शिंदे (साहित्यिक )(सहायक कुलसचिव तथा मराठी भाषा दक्षता अधिकारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर) यांच्या हस्ते आणि सौ सुमन गजानन देसाई मीरा-भाईंदर मुंबई प्रा राजेंद्र सुंदरदास फंड राहता अहिल्यानगर डॉ श्रीकांत पाटील कादंबरीकार घुणकी दिपक पवार रुकडी आदि उपस्थित मान्यवरांच्या समवेत प्रकाशित होत आहे .
त्यांच्या विविध विषयांवरील हा कवितांचा काव्यसंग्रह असून यापूर्वी त्यांचे अनेक साहित्य लेखन विविध दैनिक व दिवाळी अंक मधून प्रसिद्ध झालेले आहे
अशी माहिती कवी सरकार इंगळी यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली आहे .


