म्हसवड प्रतिनिधी तेज न्यूज
म्हसवड शहरातील अठरा पगड जातींसह विविध लहान-मोठ्या समाजांची, गुरव लोहार सुतार भोई डवरी गडशी चांभार बौद्ध, चर्मकार वडार जैन शिंपी तेली वाणी ब्राह्मण जैन गुजर साळी यांची लोकसंख्या एकूण सुमारे २३ हजार मतदारांच्या आसपास आहे. यातून छोटे-छोटे समाज, अल्पसंख्य मतदारांची एकत्रित गोळाबेरीज केली असता ही संख्या तब्बल १३ हजारांच्या घरात पोहोचत असल्याचे समोर आले आहे.
परंतु, या समाजांना सत्तेत योग्य प्रतिनिधित्व न मिळाल्याची तीव्र नाराजी सध्या शहरभर व्यक्त होत आहे. “अल्पसंख्याक समाजांची ताकद कमी समजू नका” असा सूर आता उंचावत असून, आगामी निवडणुकीत मतदानातूनच आपला हिसका दाखवण्याचा इशारा अनेक समाजबांधवांनी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे.
स्थानिक नेत्यांनी वारंवार आश्वासने दिली तरी प्रत्यक्षात सत्तेत सहभागी करून न घेतल्याने विविध समाजांत असंतोष वाढला आहे. परिस्थिती अशी की, १३ हजार मतदारांची एकत्रित नाराजी कोणत्याही उमेदवारासाठी धोक्याची घंटा ठरू शकते, असा इशारा जाणकार व्यक्त करत आहेत.
आगामी निवडणुकीत 23 हजार मतदारांपैकी मराठा धनगर आणि माळी यांची दहा हजार मते असून उर्वरित मतदान हे इतर छोट्या छोट्या जातींचे सुमारे 13 हजार आहे या समाजाला पालिकेत प्रतिनिधित्व हा मतदार 2 डिसेंबर च्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या समाजांचा कल कोणत्या दिशेने झुकतो, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

