पिराची कुरोली प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली हे गाव हिंदू ऐक्याचे आहे.या गावांमध्ये यल्लमा देवीची यात्रा दरवर्षी परंपरेनुसार दिनांक 1- 3 डिसेंबर 2025 रोजी यात्रा होणार आहे.
यल्लमा म्हणजे रेणुका ही जमदग्नी ऋषींची पत्नी व भगवान विष्णूंच्या दहा अवतरांपैकी परमुरामची आई म्हणजे यल्लमा देवी.
मार्गशिर्ष महिन्यातील मोक्षदा(मौनी) एकादशी दुसऱ्या दिवशी नैवद्याचा कार्यक्रम म्हणजे गावातील सर्वच स्त्रीया व सावंत परिवारातील स्त्रीया उपवास करून देवीला गोडाचा पुरणपोळीचा नैवैद्य करून आपल्या जुन्या वाड्यात हजर असतात.
नंतर तो नैवद्य वाजत गाजत गावातून देवीच्या मंदिरात जावून अर्पण करतात.नंतर घरी जावून स्रिया आपला उपवास सोडतात.त्यात दिवशी संध्याकाळी मंदिरातून पालखी व पुजारी जुन्या वाड्यात वाजत-गाजत व फुलं ठेवण्याचा कार्यक्रम होतो.
तसेच एकादशीच्या तिसर्या दिवशी सकाळी लवकर जुन्या वाड्यात देवीची मानाची ओटी भरण्याचा कार्यक्रम,पुजारी,जण- जोक्ती, पालखी दिवसमर वाजत-गाजत नेली जाते. तो आनंदाने कार्यक्रम चालतो.त्यानंतर दिवस मावळतीला लागल्यानंतर पुजारी, जग, पालखी हे मंदिराकडे रवाना होतात.
नंतर देवीची आरती करून सर्वजण चारच्या सुमाराम होमाकडे रवाना होतात.व अग्नहोमाची शांताता करून देवीच्या प्रथेनुसार पुजारी, अग्नीदामातून जातात व यात्रेची सांगता होते.तसेच संध्याकाळी लोकनाट्याचा कार्यक्रम आनंदाने गावातील सर्वजण बघण्याचा आस्वाद घेतात.
यल्लमादेवीच्या यात्रेला गावातील बाहेरील,परगावी येथून लोक येथून दर्शन घेवून जातात.या यात्रेस गावातील सर्वजणांचे,पोलीस बांधवांचे सहकार्य लाभते.अशा तऱ्हेने तीन दिवसीय यात्रा गुन्या गोविंदाने पार पडते.

