सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रल च्या वतीने जागतिक वकील दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रलचे अध्यक्ष लायन प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्हा न्यायालयातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व वरिष्ठ विधी तज्ञ यांचा सन्मान व सत्कार सोहळा संपन्न झाला.
सर्वप्रथम न्याय देवतेला व घटनातज्ञ, घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यात आले.
तदनंतर डी.जी.पी. डॉ.ॲड. प्रदीपसिंह रजपूत, प्रसिद्ध फौजदारी वकील ॲड.धनंजय माने, सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष.ॲड.बाबासाहेब जाधव, खजिनदार ॲड.अरविंद देडे ॲड.श्रीनिवास कटकुर,ॲड. संतोष म्हमाणे,ॲड. कुलकर्णी इत्यादी वकिलांचा लायन्स सेंट्रलचे अध्यक्ष प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी यांच्या शुभहस्ते बुके व मोत्याची माळ घालून सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी ॲड. जाधव साहेब व इतर ॲडव्होकेट आपले मनोगत व्यक्त केले.अध्यक्षपदावरून बोलताना लायन प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी म्हणाले की, न्याय मंदिराचे रक्षण करणाऱ्या, समाजातील अन्यायाविरुद्ध उभे राहणाऱ्या,त्या प्रत्येक कायदेवीरांचा सन्मान करणे हे समाजाच आद्य कर्तव्य आहे. संविधानातील प्रत्येक कलमाचा अर्थ जनतेपर्यंत पोहोचविणारा,
निरपराध लोकांचां आधार व कायद्याचा मार्ग दाखवणारा असा वकील, समाजाचा कणा मजबूत ठेवतो,अशा कायदेवीरांमुळेच लोकशाहीचे रक्षण होते.या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ॲडव्होकेट वर्गांचा कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.श्रीनिवास कटकुर व आभार लायन प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी यांनी मानले.क्लब मधील इतर सदस्यांचे या कामी बहुमोल सहकार्य लाभले.


