मोहोळ प्रतिनिधी तेज न्यूज
शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र देणारे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना त्यानी देशासाठी समाजासाठी दिलेले योगदान पाहता त्याचा आदर्श आपण सर्वांनी समोर ठेवला पाहिजे असे प्रतिपादन भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे यांनी केले आहे.
यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे यांच्या शुभहस्ते प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणेसाठी संपुर्ण देशभर प्रचंड मोठ्या संख्येने कार्यक्रम होत आहेत. चैत्य भूमी, दिक्षा भूमी येथे लाखो चा जनसागर अभिवादन करण्यासाठी उसळला असल्याचे चित्र दरवर्षी आपण पहात असतो.
सौंदणे तालुका मोहोळ येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी भारत भाऊ सुतकर, परमेश्र्वर माने, रमेश गोडसे, उल्हास माने, रईस पठाण, संतोष नामदे, तुकाराम भानवसे, विकास कोकाटे, रमेश भानवसे, गोरख भानवसे, ग्राम विकास अधिकारी लोखंडे , जीलानी पठाण, अविनाश मोकाशी, सुभाष भानवसे, तानाजी सुतकर, सुभाष सुतकर, वसंत भानवसे, नागनाथ साळवे, बलभीम भानवसे, राजेंद्र भानवसे, विठ्ठल वाघमारे, बाळासो सरवदे, शाम सुतकर, कुबेर कोळी , चांद मुजावर, धंनजय भानवसे, कय्युम मुजावर , सुहास भानवसे, सिद्धेश्वर राऊत , ज्ञानेश्र्वर वाघमारे, प्रकाश सुतकर, बब्रुवान कोळी, बाळासो वाघमारे, कल्याण भानवसे, रामहरी माने, श्रीराम भानवसे, राजू सुतकर, बाळू सुतकर रविंद्र राऊत , हनुमंत माने , कुबेर सुतकर यांचेसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


