तमाशाच्या फडातून मर्सिडीजपर्यंतचा थक्क करणारा प्रवास!
बिग बॉस मराठीची माजी स्पर्धक आणि प्रसिद्ध लावणी नृत्यांगना राधा पाटील radha patil हिने नुकतीच आलिशान मर्सिडीज कार खरेदी केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या राधाने आपल्या मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले आहे.
लावणी कलाकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या राधा पाटीलने महाराष्ट्रभर आपल्या दमदार नृत्याने वेगळी ओळख निर्माण केली. त्यानंतर तिला 'बिग बॉस मराठी ६' मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आणि ती घराघरात पोहोचली.
आज ज्या राधाकडे मर्सिडीज उभी आहे, त्यामागे अनेक वर्षांची संघर्षमय वाटचाल आहे. लावणी कलाकारांना अनेकदा कमी लेखले जाते, टीका केली जाते, पण राधाने त्या सर्व टीकांना उत्तर आपल्या यशाने दिले. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडतानाही तिने लावणी कलेचा अभिमान व्यक्त केला होता.
कालपर्यंत ज्या मुलीला लोक फक्त लावणी नर्तिका म्हणून ओळखत होते, ती आज मर्सिडीजची मालकीण झाली आहे. हे यश केवळ एका गाडीचे नाही, तर मेहनत, जिद्द आणि स्वप्नांवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक कलाकाराच्या संघर्षाचा विजय आहे.
राधा पाटीलला मनःपूर्वक शुभेच्छा!
"लोक काय म्हणतील याचा विचार केला असता, तर मर्सिडीजच्या स्टेअरिंगपर्यंत पोहोचता आलं नसतं."
लेखक - दत्ता पवार


