भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
म्हसवड येथील श्री सिद्धनाथ मंदिराचे दर्शन घेऊन परतणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील भाविकांवर काळाने घाला घातला. माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी परिसरात भाविकांची पिकअप गाडी रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत लहान मुले व महिलांसह 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून 7 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
पंढरपूर म्हसवड रोडवर तांदुळवाडी येथे आल्यावर टमटमच्या गाडीत बिघाडा झाल्यामुळे वाहन चालकास वाहनावर नियंत्रण ठेवता न आल्यामुळे टमटम विहिरीत पडले या वाहनांमध्ये एकूण 15 जण प्रवास करीत असल्याची माहिती समजते त्यामध्ये पंढरपूर तालुक्यातील राजणी येथील प्रवासी असल्याचे समजत आहे.
यामध्ये सिद्धेश्वर पोपट जाधव, वाहन चालक सागर चौगुले, अपूर्व अमोल सातोरे, आरव अमोल सातोरे,बालाजी बावचे, शशिकला पोपट जाधव,संदीप बावचे हे जखमी झालेले आहेत.
तर पूजा अमोल सातोरे, ताई बावचे, पूजा बालाजी बावचे, अश्विनी संदीप भावचे,सार्थक संदीप बावचे, संस्कृती संदीप बावचे, गणेश बालाजी बावचे,बालाजी बावचे यांचा लहान मुलगा हे सर्व मयत झाले आहेत .
घटनास्थळी खासदार धैर्यसिंह मोहिते पाटील,आमदार उत्तमराव जानकर, पंढरपूर च्या नगराध्यक्षा प्रणिता भालके, शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगूटे,पोलीस अधिकारी यांनी भेट दिली.
या तांदूळवाडी परिसरात वारंवार अपघात घडत आहेत.या रस्त्यावर अनेक ठिकाणी दिशा दर्शक फलक लावलेले नाहीत.विहिरीला काठडे नाहीत.त्यामुळे वारंवार अपघात घडत आहेत. तरी संबधित अधिकारी यांनी वेळी दखल घ्यावी अशी प्रवाशी मागणी करीत आहे.




