भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील युनियन बॅकेच्या शाखाधिकारी पदी प्रशांत आवताडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अगोदरचे शाखाधिकारी बालाजी हरके यांची बेळगांव जिल्ह्यात बदली झाली आहे.
या निमित्ताने शाखाधिकारी आवताडे व हरके यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
यापूर्वी प्रशांत आवताडे यांनी या शाखेत काम केले आहे. त्यामुळे त्याच्या कडून चांगल्या कामाची अपेक्षा खातेदाराकडून केली जात आहे.

