जाधववाडी ता.माढा मारुती मंदिराच्या सभामंडप कामाचे भूमिपूजन संपन्न
माढा प्रतिनिधी तेज न्यूज
माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अभिजीत पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून माढा तालुक्यातील जाधववाडी येथे मारुती मंदिराच्या सभा मंडपाचे कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
निवडणुकीत प्रचारादरम्यान स्थानिक नागरिकांनी आमदार अभिजीत पाटील यांच्याकडे सभामंडपाची मागणी केली होती, ती पूर्ण केल्यानं नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळाले.
माढा मतदारसंघातील जनतेने टाकलेला विश्वास आपण नक्कीच सार्थ ठरवू. माढ्याच्या जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्यात आपण यशस्वी होत असून भविष्यातील होणाऱ्या विकासकामांनाही निधी कमी पडू देणार नसल्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले.
विकासकामे करताना राजकारणापलीकडे जाऊन काम करण्याची गरज आहे. विकासकामे करताना कोणताही दुजाभाव आपण केलेला नाही. येणाऱ्या काळात अधिक जोमाने कामे करण्यासाठी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची, सहकार्याची गरज आहे. तुम्ही फक्त मला खंबीरपणे साथ द्या, माढा तालुक्याचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी भारत आबा शिंदे,राजाभाऊ चवरे,आनंद कानडे, दीपक देशमुख, अंगद जाधव, शिवाजी भाकरे, विनंती कुलकर्णी, निलेश पाटील,सरपंच राहुल जाधव, विजय भाकरे, शिवाजी कन्हेरे आदी उपस्थित होते.

