भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मंदिरात कार्तिक एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची महापूजा प्रशांत माळवदे व प्राची प्रशांत माळवदे यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी पहाटे पाच वाजता श्रीच्या मूर्तीची अभिषेक करून महापूजा करण्यात आली.
यावेळी आनंद देशपांडे, प्रवीण शिंदे, सुधीर गांधी, रवींद्र कारंडे, मनोज कलढोणे, शत्रुघ्न कलढोणे, अमोल लंगोटे, सुनील माने, राजू बिडवे, पुरुषोत्तम शिंदे, वसंत लाले, गणेश मायणीकर, आबा लोखंडे, महेश शिंदे, दादा आगलावे, संतोष शिंदे, निळकंठ शिंदे, दगडू शिंदे, दगडू इंगोले, मुरलीधर लोखंडे,सखाराम लोखंडे ,खंदारे, विठ्ठल लोखंडे,कोमल शिंदे, वैशाली शिंदे, अरुणा म्हेत्रे, नूतन बंडगर, कारंडे, होणमुटे , सुमन शिंदे,शालन आगलावे,स्वाती शिंदे आदि महिला, व भाविक भक्त उपस्थित होते.पूजे नंतर प्रसाद वाटप करण्यात आला.
रात्री भजनकरी मंडळींनी भजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.तसेच मंदीर परिसरात विविध प्रकारची रोषणाई करण्यात आली होती.तसेच परिसरात केळी,नारळ व फुले यांची सजावट करण्यात आली होती.


