पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळोली शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि भौतिक सुविधा उपलब्ध करून शाळेच्या प्रगती साठी सदैव प्रयत्नशील असणाऱ्या शाळा व्यवस्थापन समितीची निवड आज खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
त्यामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींच्या पालकांची बैठक बोलावून शासनाच्या परिपत्रकानुसार सदस्यांची निवड करण्यात आली त्यामध्ये अध्यक्ष म्हणून हनुमंत सर्जेराव नरसाळे तर उपाध्यक्ष पदी साधना दत्तात्रय किर्ते तसेच रमेश थोरात. तानाजी चांदणे. दीपक कोळेकर. चंद्रकांत फाळके. संजय शिंदे. मधुकर शिरसाट. पार्वती काळे. पिनूबाई टिंगरे.मोहिनी सुतार. प्रियंका मगर.रूपाली पराडे.बाळासाहेब नरसाळे.या सदस्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी हनुमंत नरसाळे यांनी सांगितले की पुढील काळात शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहत शाळेचे कामकाज पाहून सर्व. शिक्षकांना सहकार्याची भूमिका असून शाळेची गुणवत्ता, शिस्त, स्कॉलरशिप व इतर स्पर्धा परीक्षा, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव, यासाठी शिक्षकांनी कष्ट घेत शाळेची परंपरा राखली आहेच पुढील काळात ही अशीच प्रगती साधण्यासाठी आमच्या सर्व सदस्यांच आणि पदाधिकारी यांच सहकार्य कायम असणारच आहे.
यावेळी मावळते आणि नवनियुक्त अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य यांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला.या सभेचे कामकाज मुख्याध्यापक अनिल जगताप यांनी पाहिले.
तसेच जळोली गावचे पदाधिकारी समाधान काका नरसाळे .बलभीम नरसाळे. मनोज नरसाळे. महेश नरसाळे. गणेश जाधव सर. सरपंच ज्योतीराम मदने. माजी अध्यक्ष बाळासो नरसाळे. माजी उपाध्यक्ष शहाजी नरसाळे .आदी उपस्थित होते.यावेळी सहशिक्षक जयवंत कापसे नागनाथ गायकवाड कैलास नरसाळे सिध्देश्वर लोंढे ज्ञानेश्वर दुधाणे, बाळासाहेब खांडेकर, देवकी कलढोणे दुधाणे उपस्थित होते.

