भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील हटकर कोष्टी युवक संघटनेच्या वतीने मुंबई येथील जॉय ऑफ गिविंग या सामाजिक संघटनेचा आदर्श संपादक व दैनिक नवमित्र चा आदर्श समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल तेज न्यूज चॅनलचे संपादक प्रशांत माळवदे यांचा शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जयकुमार कोले चंद्रकांत कापसे संजय आंबेकर माणिक कोले सुरेश कापसे मुरलीधर कोले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी हटकर कोष्टी समाज बांधवांचे आभार माळवदे यांनी मानले.
यावेळी या कार्यक्रमाचे आयोजन बाळासाहेब कापसे यांनी केले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता कापसे यांनी केले तर आभार राहुल लंगोटे यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष कोले,अशोक शहाणे,हरिदास कापसे,राजू कापसे, तुकाराम कापसे, संतोष कापसे, राहुल कापसे, राजू निराळी, पप्पू कोले यांनी सहकार्य केले.या कार्यक्रमास विद्यार्थी पालक महिला व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.