सांगोला प्रतिनिधी तेज न्यूज
फॅबटेक एज्युकेशन सोसायटी संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या दैदीप्यमान कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्यातील एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श संस्था पुरस्कार सांगोला येथील फॅबटेक एज्युकेशन सोसायटी संस्थेला कोल्हापूर येथे राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंञी तथा कोल्हापूर पालकमंञी प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते शनिवार दिनांक ३१ मे २०२५ येथे प्रदान करण्यात आला.
फॅबटेक एज्युकेशन सोसायटी अंतर्गत फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (स्वायत्तता दर्जा प्राप्त), पॉलिटेक्निक (डिप्लोमा) इंजिनिअरिंग, फार्मसी (डी. फार्म आणि बी. फार्म) पी. जी. डी. एम. एल. टी, पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज अशा विविध शैक्षणिक क्षेत्रातील फॅबटेक संस्थेने कार्य कौतुकास्पद असून संस्थेने सामाजिक भान डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांना ज्ञानार्थी बनविण्याचे उत्कृष्ट काम अविरत चालू ठेवले आहे. संस्थेच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेने फॅबटेक एज्युकेशन सोसायटी सांगोला या संस्थेला राज्यस्तरीय आदर्श संस्था पुरस्कार शनिवार दिनांक ३१ मे २०२५ रोजी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंञी तथा कोल्हापूर पालकमंञी प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते फॅबटेक टेक्निकल कॅम्पस मधील फार्मसीचे प्राचार्य डाॅ. संजय बैस, पाॅलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. तानाजी बुरूगंले, पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य प्रा. सिकंदर पाटील, कार्यालयीन अधिक्षक प्रा. राजेंद्र पाटील, प्रा. शरद आदलिंगे यांनी हा पुरस्कार स्विकारला.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात एकनाथ स्वाभिमानी सेनेचे प्रदेशाध्यक्ष डाॅ. बापुसाहेब आडसुळ, खासदार धैर्यशील माने, खासदार मुन्ना महाडिक, राज्य आरोग्य विभाग प्रमुख मंगेश चिवटे आदींसह अनेक अनेक आजी माजी आमदार खासदार मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फॅबटेक संस्थेला राज्यस्तरीय आदर्श संस्था पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर फॅबटेक एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, प्राचार्य डॉ. रविंद्र शेंडगे, उप प्राचार्या डॉ विद्याराणी क्षीरसागर आदींसह सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन होत आहे.