आदर्शमाता प्रतिष्ठान चे अध्यक्ष विश्वास मोहिते यांचे आवाहन
कराड प्रतिनिधी तेज न्यूज
मागासवर्गीय महामंडळाच्या माध्यमातून मंजूर केलेली कर्ज प्रकरणी राष्ट्रीयकृत बँकांकडून आडवणूक केली जात असून पाटण तालुक्यातील अशी बँकांकडून कुणाची अडवणूक झाली असल्यास त्यांनी संपर्क साधावा असे आवाहन विश्वास मोहिते यांनी केले आहे.
मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय समाजातील आर्थिक दुर्बल कुटुंबांचे आर्थिक स्थर उंचाविला जावा यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, महात्मा ज्योतिबा फुले मागासवर्गीय महामंडळ, संत रोहिदास महामंडळ, उमाजी नाईक, महामंडळ वसंतराव नाईक महामंडळ अशा महामंडळाच्या माध्यमातून कर्ज प्रकरणे मंजूर करून ती बँकेच्या माध्यमातून वितरित केले जातात. परंतु अलीकडच्या काळामध्ये महामंडळाने मंजूर करून ती बँकांकडे आल्यानंतर बँका मात्र अडवणूक करतात त्यामुळे बँकांना योग्य त्या सूचना देण्यात याव्यात तसेच तालुका प्रशासन बँक प्रतिनिधी आणि मागणी करणारे शिस्त मंडळ यांची संयुक्त बैठक ही लावण्याची मागणी विश्वास मोहिते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या मागणीच्या अनुषंगाने पाटण तालुक्यातील पहिली बैठक बुधवार 11 जून 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता पाटण या ठिकाणी आयोजित केली असून अर्जदारांची कर्ज देताना अडवणूक झालेली आहे त्यांनी या बैठकीपूर्वी विश्वास मोहिते संस्थापक अध्यक्ष आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान पाडळी (केसे),तालुका कराड, जिल्हा सातारा मोबाईल नंबर 97 63 20 10 56 येथे संपर्क साधावा
म्हणजे पाटण तालुक्यातील होणाऱ्या बैठकीमध्ये संबंधितांची माहिती सविस्तर बैठकीमध्ये मांडता येईल असे आवाहन विश्वास मोहिते यांनी केले आहे.