वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्था धोंडेवाडी येथे शिवराज्याभिषेक दिना निमित्त व्याख्यानाचे आयोजन
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील धोंडेवाडी येथील वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्था धोंडेवाडी येथे शिवराज्याभिषेक दिना निमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.मा.आ.मंगल प्रभात लोढा मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता, महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून साकार करण्यात आला.
कार्यक्रमाचे व्हिडिओ व्दारे आँनलाईन उद्धाटन मा.ना.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते झाले, तसेच मनिषा वर्मा , सचिव कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता, महाराष्ट्र राज्य यांचा संदेश व कौशल्य गीतानी केली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष कल्याणराव काळे हे होते, विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या विचारांचे आचरण करावे व्यवसाय प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारचे कौशल्य संपादन करून आपले व आई वडील यांचे स्वप्न साकार करावे, मुलींना आपल्या संस्थेत व्यवसाय प्रशिक्षणला मोफत प्रेवेश आहे,असे सांगितले
यावेळी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, व्याख्याते समाधान काळे सर,यांनी, नागरिकत्व आणि शिष्टाचार या विषयावर सखोल मार्गदर्शन केले,सोमनाथ जगताप यांनी सामाजिक समरसता विषयावर बोलताना सांगितले की, एकमेंकामेकामध्ये संवाद वाढवा
संस्कृती जपा जात/पात मानूं नये आई वडील यांचा सन्मान करा , कार्यक्रमाचे प्रास्ताविक आय.टी.आय. चे प्राचार्य मा, संतोष गुळवे सर यांनी केले,आय टी आय मधील कार्याचा आढावा, सांगुन काळानुसार बदल घडवून आम्ही सोलर टेक्निशियन व्यवसाय प्रशिक्षण कोर्स सुरू केला आहे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था कार्यरत असते, असे सांगितले,
यावेळी या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब काळे गुरूजी, सचिव चंद्रकांत कुंभार, संचालक मोहन बापू नागटिळक, प्राचार्य संजय कुलकर्णी , प्राचार्य शिवाजीराव शेंडगे व सर्व निर्देशक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल आयरे यांनी केले तर आभार अनिल ननवरे यांनी केले