कमलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
कमलापूर गावचे सुपुत्र,पुणे येथील
बांधकाम क्षेत्रातील नावाजलेले "अशोका वॉटरप्रूफिंग कंपनी" या कंपनीचे सर्वेसर्वा तथा संस्थापक अध्यक्ष श्री.अशोक (भाऊ)आदलिंगे यांना नुकताच बांधकाम व्यवसायामध्ये विशेषतः वॉटरप्रूफिंगच्या कामामध्ये गरुड झेप घेतलेली आहे.त्यांना नुकताच आंतरराष्ट्रीय पातळीवरील "सुपर प्रीमियम एप्लीकेटर" हा जागतिक स्तरावरील पुरस्काराचे वितरण स्पेन,इटली,बरसोलंना देशामध्ये बांधकाम व्यवसायामध्ये भरीव काम केल्याबद्दल पुरस्कार वितरण सोहळा प्रमुख मान्यवरांचे उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
अशोक आदलिंगे सामाजिक कार्यामध्ये हिरीरीने सहभाग घेतात. त्यांची कर्मभूमी पुणे असले तरी त्यांचं मोलाचं सहकार्य कमलापूर पंचक्रोशी मध्ये नेहमीच असते. मागील वर्षी अनेक 200 गरजू विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग चे वितरण करण्यात आले होते. अशोक भाऊ आदलिंगे यांची परिस्थिती अतिशय बेताची होती.प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी पुणे येथे शिक्षण संकुल उभे केले आहे,बांधकाम व्यवसायाबरोबर इतर क्षेत्रात ही त्यांची प्रगती आदर्श घेण्याजोगे आहे. पाय जमिनीवर ठेवून चालणार हा कमलापूर गावचा सुपुत्र सात समुद्रा पार आपल्या व्यवसायाचा झेंडा फडकवतो याचा सार्थ अभिमान कमलापूर वाशी यांना आहे. त्यांच्या जडणघडणीमध्ये त्यांच्या आईचा व वडिलांचा खूप मोठा वाटा आहे.
आईने कष्ट करून लहानाचं मोठं केलं. शिक्षण घेऊन ते पुण्यामध्ये सुरुवातीला स्थायिक झाले. असेही गतिमान व्यक्तिमत्व आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार प्राप्त होतो याचं सर्व कौतुक पण कमलापूर पंचक्रोशी मध्ये होत आहे.