पंढरपूर/प्रतिनीधी तेज न्यूज
गादेगाव येथील विठ्ठल अर्बन सोसायटीचे संचालक व अमृता दूध डेअरीचे यशस्वी चेअरमन संजय पवार यांची कन्या कु.अमृता संजय पवार हिने नीट परीक्षेत तब्बल 600 गुण मिळवून 'एमबीबीएस' या अत्युच्च वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवला आहे. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उद्योग व व्यापारी भागाचे प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे.
कु अमृता पवार हिचा भाऊ आशिष पवार हेदेखील एमबीबीएस करत असून सध्या बँगलोर येथे शिक्षण घेत आहेत. आई सौ.वंदना संजय पवार या एम.ए शिक्षण घेतलेल्या, सुसंस्कारित माता आणि वडील संजय पवार हे दहावी शिक्षण घेऊन व्यवसायात यशस्वीपणे कार्यरत असलेले, या दोघांचं योग्य मार्गदर्शन आणि पाठबळ अमृताच्या यशामागे निश्चितच मोलाचं आहे. अमृताचं हे यश हे आजच्या ग्रामीण मुला-मुलींना एक मोठा संदेश देतंय की योग्य दिशा, कष्ट, आणि चिकाटी असली, तर कोणतीही स्वप्नं पूर्ण करता येतात.