करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीमला सद्गुरूं संतांचे आशीर्वाद
करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
आज करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीमच्या वतीने वृक्षारोपण मोहीम सुरू असतानाच देवगड संस्थांनचे महंत तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर सदस्य परमपूज्य भास्करगिरी महाराज आणि चोपदार बाळू महाराज यांचे शुभहस्ते वृक्षारोपण करून आशीर्वाद घेतले.सध्याच्या काळात वृक्षारोपण ही काळाची गरज असून श्रीकृष्ण बोधात सांगितले प्रमाणे झाड लावल्यावर झाडांच्या पानांवर पावसाचे जेवढे थेंब पडतात तेवढे यज्ञात आहूती दिल्याचं पुण्य पदरात पडते असे सांगून सर्व करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीमच्या सदस्यांना आशिर्वाद देते अभिनंदन केले.
तसेच लावलेलं झाड हे सद्गुरू किसनगिरी बाबांच्या नावाने लावले यांचा आनंद वाटला सांगितले. यावेळी बापू खारे यांचे शुभहस्ते लेकीच झाड टीमकडून बाबांचा सत्कार करण्यात आला.यावेळी देवगड संस्थांनचे वतीनेही विश्वजीतचा सत्कार करुन टीमला आशिर्वाद मिळाला.
याकामी करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीमचे संकल्पक ज्ञानेश्वर दुधाणे बापू खारे विश्वजीत शिंदे,विशाल बोधे,चेतन पुरवत, देविदास काटवटे हरिश्चंद्र वास्ते, पांडुरंग काटवटे, प्रमोद रेडे, नागेश रेडे.नंदकुमार कपडेकर,दत्तप्रसाद दुधाणे,हरी फासे,शुभमं सांगोलकर,अक्षय नगरकर,अशोक शिंगटे पाटील,छगनराव खारे,आदी सदस्य वृक्षप्रेमी मोठ्या संख्येने अधिक परिश्रम घेत आहेत.हा योग घडवून आणण्यासाठी आमचे मित्र महेंद्र कुमार फलटणे यांनी अधिक सहकार्य केले.