आशा.....
आशा हा शब्द दोन अक्षरांचा असला तरी तो खूप मोठा आहे.इंग्रजी मध्ये Hope तर हिंदी मध्ये उम्मीद या अर्थाने हा शब्द वापरला जातो.
मनुष्य आपले संपूर्ण जीवन या दोन शब्दावर गुण्यागोविंदाने जगत असतो.मला मिळेल,मी जाईल,मी जिंकेल,मी बांधील,मी घेईल,मी खूप मोठा होईल या एका सकारात्मक शब्दांची खूप मोठी जादू आहे....या सकारात्मक शब्दांमुळे मनुष्य कधीही निराश न होता..... उम्मीद ठेवून लढत राहतो.
नाण्याला जशा दोन बाजू असतात.. तसेच जीवन जगत असताना घडत असते.अशा व निराशा..सुख - दुःख, हारणे- जिंकणे...कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला जाऊन मनुष्याला आपले जीवन जगावे लागतेच... त्यामुळे मनुष्याने निराश न होता कोणत्या ही गोष्टींचा सुवर्णमध्य साधून... जीवन जगण्याचा संकल्प केला तर मनुष्याच्या जीवनात कधीच निराशा येणार नाही.
पूर्वीच्या लोकांचा व तंत्रज्ञानाच्या काळातील लोकांचा अभ्यास केला तर एकच फरक लक्षात येतो.पूर्वीचे लोक नेहमी सत्याच्या बाजूने पारडे जड करायचे.. आधुनिक काळात लोक बदलत चालले आहे... जिकडे पैसा तिकडे पारडे फिरते...परंतू हा क्षणभंगुर आनंद आहे... कायमस्वरूपी आनंद मिळवायचा असेल तर सत्य, खरे, प्रामाणिकपणे, निसर्गाच्या सान्निध्यात राहून निस्वार्थी..आपली ओंजळ जागांसाठी खुली केली तर मनुष्य जगातील सर्वात महान व्हायला वेळ लागणार नाही.जसे सूर्य, चंद्र, तारे, वनस्पती,प्राणी, पाऊस व मृदा कोणताही मोबदला न घेता आपला पदर ना गरीब व ना श्रीमंत,ना जवळच व ना परका म्हणून आपला पदर खुला ठेवतो.... त्यामुळे त्यांच्या पुढे इंग्रजीतील The जोडून येतोच.
गेल्या पंधरा दिवसांपासून वेगवेगळ्या क्षेत्रातील आत्महत्या पाहिल्या तर त्या पाठीमागे एकच कारण Ego व पैसा..... जीवनाला शून्य किंमत देणारे लोक...शब्दाने साक्षर झाले पण मनाने साक्षर झाले आहे का..?
म्हणून शेवटी एकच आशा..... सूर्य, चंद्र,तारे,वायू,अग्नी,पाऊस व मृदा जेवढे गोरगरीबाला भरभरून देतात... तेवढेच श्रीमंतांना ही भरभरून देतात...पक्षांची मंजूळ किलबिलाट,झऱ्यांचा झूळझूळ आवाज,पानांची सळसळ,मातीचा सुगंध जसा श्रीमंतांना येतो तसाच गरीबांना येतो...
त्यामुळे जीवनात निराश न होता ...आशा ठेवून जगाल तर जीवनाचा हेतू पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही... पणं... प्रथम स्वतः ला जगातील अनमोल दागिना म्हणून स्वतः ची किंमत स्वतः वाढवत जाल तेव्हा.....
निराशेच्या गर्तेत न सापडता आशेचा गारवा घेऊन मार्गक्रमण करत असाल तर समजून जावं... जगातील सर्वात सुखी व सर्वात श्रीमंत व्यक्ती आपल्या शिवाय दुसरे कोणी नाही....
प्रा.आनंदा आलदर ✒️ 9765066247